अत्यंत व्यस्त आणि धावपळीच्या जीवनशैलीमुळे हल्ली आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे अनेकांच्या चेहऱ्यावर मुरुमे येणे, केस गळणे, त्वचेच्या समस्या अशा प्रकारच्या काही आजारांना सामोरे जावे लागते. तब्येतीच्या छोट्या छोट्या समस्या उद्भवू नयेत यासाठी दररोज व्यायाम करणे, खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्षण देणे आवश्यक आहे. यामुळे शरीर पूर्णपणे निरोगी राहण्यासाठी मदत होईल. निरोगी आरोग्याकरिता दररोज फक्त एक गुळाचा खडा (Jaggery stone) खाल्ल्यास आरोग्याच्या अनेक समस्या (Health Tips) दूर व्हायला मदत होते.
- गुळात भरपूर पोषक तत्त्वे (nutrients) असतात. प्रथिने, जीवनसत्त्व बी १२, जीवनसत्त्व ६, फोलेट, कॅल्शियम, लोह, फॉस्फरस आणि सेलेनियम इत्यादिंचा चांगला स्त्रोत गुळात असतो. त्यामुळे आजारांशी लढण्यासाठी शक्ती मिळते.
- गूळ उष्ण असल्याने अति उष्म्याचा त्रास असल्यास गुळाचे अति सेवन करू नये.
- गूळ खाल्ल्याने शरीरातील अशक्तपणा (Weakness) दूर होतो. पचनशक्ती (digestive power) मजबूत होते. रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्यासाठी रोज गुळाचा खडा खावा.
- दररोज गुळाचा तुकडा खाल्ल्याने दृष्टी सुधारते. डोळे निरोगी राहतात.
- सर्दी आणि खोकला (Cold and cough) बरा होण्यासाठी गुळाचा खडा खावा. यामुळे खोकला लवकर बरा व्हायला मदत होते.