BJP : भाजपच्या रणनीतीमुळे स्वकीय नेते चिंतेत

148
BJP : भाजपच्या रणनीतीमुळे स्वकीय नेते चिंतेत
BJP : भाजपच्या रणनीतीमुळे स्वकीय नेते चिंतेत

मध्य प्रदेशात भारतीय जनता पक्षाने निवडणूक जिंकण्याची सर्व तयारी केली असून त्यासाठी विशेष रणनीती राबविण्यात येत आहे. यामुळे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यासह अनेक आमदार चिंतेत पडले आहे. कारण मुख्यमंत्री असूनही शिवराजसिंह चौहान यांचे नाव पक्षांच्या तिन्ही यादीत आले नाही. यामुळे अनेक आमदारांना देखील आपले तिकीट कापले जाणार अशी काळजी वाटतेय. (BJP)

मध्य प्रदेशात वर्षाअखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरू आहे. या वेळी सत्ताधारी भाजपा स्वबळावर पूर्ण बहुमत मिळवून सरकार स्थापन करण्याच्या उद्देशाने रिंगणात उतरत आहे. अशातच एक माहिती प्राप्त झाली आहे की, मध्य प्रदेशात विद्यमान मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळाचे तिकीट कापले जाऊ शकते, अशी चर्चा भाजपच्या गोटात सुरू आहे. यामुळे मध्य प्रदेशात राजकारण तापण्याची शक्यता आहे. (BJP)

(हेही वाचा – Colaba-Vandre-Seepz Metro : मुंबई अंडरग्राऊंड मेट्रोतही मोबाईल रिचेबल)

२०१८ च्या चुकांमधून धडा घेत भाजपने या वेळी आपल्या रणनीतीत बरेच बदल केले आहेत. या वेळी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याशिवाय पक्षाने इतर ज्येष्ठ नेत्यांनाही निवडणूक प्रचारात पुढे केले आहे. मध्यप्रदेशातील सत्ताविरोधी वातावरण शमवण्यासाठी पक्षाने आपल्या ४० हून अधिक विद्यमान आमदारांची तिकिटे रद्द करण्याची तयारीही केली आहे. मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी  (PM Narendra Modi) मध्य प्रदेशला मोठी भेट दिली आहे. (BJP)

पंतप्रधान मोदी मध्य प्रदेशातील बीना येथे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) रिफायनरीची पायाभरणी केली आहेत. या प्रकल्पामध्ये राज्यभरातील १० नवीन औद्योगिक प्रकल्पांचा समावेश आहे. ४९ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून उभारण्यात येणाऱ्या पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्समध्ये एक लाखाहून अधिक लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे. (BJP)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.