2000 Rupees Note Exchange : अजुन मिळणार आठवडाभराचा कालावधी

आरबीआयने आढावा घेत नोटा बदलून देण्यासाठी मुदत वाढवली आहे.

137
2000 Rupees Note Exchange : अजुन मिळणार आठवडाभराचा कालावधी
2000 Rupees Note Exchange : अजुन मिळणार आठवडाभराचा कालावधी

दोन हजार रुपयांच्या नोटा बदलण्याची (2000 Rupees Note Exchange) मुदत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) वाढवली आहे. यासाठी आता आठवडाभराची मुदत देण्यात आली आहे. याबाबत शनिवारी, (३० सप्टेंबर) रोजी रिझर्व्ह बँकेने ((RBI) परिपत्रक काढत ही माहिती दिली आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने १९ मे २०२३ रोजी चलनातून २००० रुपयांच्या नोटा बाद करण्याची घोषणा केली होती. यासाठी बँकेने लोकांना चार महिन्यांची मुदत दिली होती. जेणेकरून ते त्यांच्या बँकेत किंवा जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन त्यांच्या जुन्या नोटा सहज बदलू शकतील. त्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबर २०२३ रोजी संपत होती. मात्र, आरबीआयने आढावा घेत नोटा बदलून देण्यासाठी मुदत वाढवली आहे. रिझर्व्ह बँकेने एकावेळी २०,००० रुपयांपर्यंतच्याच २००० रुपयांच्या नोटा बदलून देण्याची मर्यादा घातली आहे. (2000 Rupees Note Exchange)

आरबीआयनुसार,२९ सप्टेंबर २०२३ पर्यंत ९६ टक्के २००० रुपयांच्या नोटा परत आल्या आहेत. १९ मे २०२३ रोजी २००० रुपयांच्या ३.५६ लाख कोटी मूल्याच्या नोटा चलनात होत्या. त्यानंतर आतापर्यंत ३.४२ लाख कोटी रुपये मूल्य असणाऱ्या नोटा आरबीआयकडे परत आल्या आहेत.आरबीआयने यासंदर्भात अधिक माहिती देताना सांगितले की ज्यांनी अजूनही २००० रुपयांच्या नोटा बदलल्या नसतील त्यांना आता ७ ऑक्टोबरपर्यंत नोटा बदलता येणार आहे. एकाच वेळी कमाल २० हजार रुपयांच्या नोटा बदलता येणार असल्याचे आरबीआयने स्पष्ट केले आहे.

मात्र ७ ऑक्टोबर नंतर काय होणार
आरबीआयने २००० रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी ७ऑक्टोबरपर्यंतची मुदत वाढवून दिली आहे. त्यानंतर ८ऑक्टोबरपासून बँकांच्या मार्फत नोटा बदलून देण्याची प्रक्रिया थांबवण्यात येणार आहे. ८ऑक्टोबरपासून आरबीआयने निश्चित केलेल्या केंद्रात २००० रुपयांच्या नोटा जमा करता येणार आहेत. याच ठिकाणाहून नोटा बदलून मिळणार आहे.

(हेही वाचा : Indian Economy : जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने भारताची वाटचाल सुरू – राजीव चंद्रशेखर)

२००० रुपयांची नोट चलनातून मागे घेण्याचा निर्णय का?
२००० रुपये मूल्याची नोट नोव्हेंबर २०१६ मध्ये जारी करण्यात आली. त्या वेळी चलनात असलेल्या सर्व ५०० रुपये आणि १००० रुपयांच्या नोटा एका झटक्यात चलनातून रद्द करण्यात आल्या होत्या. त्यावेळी बाजारातील चलनाची मागणी पूर्ण करण्यासाठी २००० रुपयांची नोट जारी करण्यात आली होती. सामान्य व्यवहारांसाठी दोन हजार रुपयांची नोट वापरली जात नसल्याची बाब समोर आली होती. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या “क्लीन नोट पॉलिसी” च्या अनुषंगाने, २००० रुपये मूल्याच्या बँक नोटा चलनातून काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.