Menopause : मेनोपॉजमुळे केस गळती होत असल्यावर हे उपाय करा

183
Menopause : मेनोपॉजमुळे केस गळती होत असल्यावर हे उपाय करा
Menopause : मेनोपॉजमुळे केस गळती होत असल्यावर हे उपाय करा

महिलांमध्ये वयाच्या ४० वर्षांनंतर मेनोपॉज  (Menopause)सुरू होते. मेनोपॉजच्या काळात महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. या काळात शरीरात अनेक प्रकारचे हार्मोनल बदल होतात.शरीरातील इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉनचे प्रमाण कमी होते. मेनोपॉजमुळे केवळ मूड बदलणे, निद्रानाश होतो असे नाही तर त्वचेच्या समस्या आणि केस गळणे देखील होते. मेनोपॉजच्या काळात केस गळण्याची समस्या वाढते. या काळात आंघोळीनंतर केसांना कंघी केल्याने केस जास्त तुटतात. मेनोपॉजच्या काळात केस गळण्याची समस्या कमी करण्यासाठी तुम्ही काही टिप्स फॉलो करू शकता. चला जाणून घेऊया केस गळती टाळण्याचे उपाय.

केस गळणे कमी करण्यासाठी व्यायाम करा (Hairfall)

मेनोपॉज (Menopause)दरम्यान हार्मोनल बदलांमुळे तणाव होतो. शरीरातील इस्ट्रोजेनचे उत्पादन कमी झाल्यामुळे त्याचा मेंदूवर परिणाम होतो. त्यामुळे मूड स्विंग, चिंता यासारख्या समस्या उद्भवू लागतात. चिंतेमुळे केस गळायला लागतात.मेनोपॉजच्या काळात केस गळण्याची समस्या कमी करण्यासाठी दररोज व्यायाम किंवा योगासने करावीत. मॉर्निंग वॉक करावा. सुरुवातीला अर्धा तास रनींग करा. व्यायामामुळे तणाव तर कमी होतोच शिवाय शरीर निरोगी राहते.सेतू बंध सर्वांगासन, जानुशीर्षासन आणि बद्धकोनासन करावे. या सर्व सोप्या पद्धती मेनोपॉजच्या काळात तुम्हाला निरोगी ठेवतील.

(हेही वाचा :Western Railway : डब्बे झाले इंजिन पासून वेगळे, प्रवाशांचा गोंधळ)

केस गळण्याची समस्या कमी करण्यासाठी आहार

खाण्यापिण्याच्या योग्य सवयींमुळे शरीराशी संबंधित अनेक समस्यांपासून सुटका मिळू शकते, असे म्हणता येईल. त्याचप्रमाणे मेनोपॉजच्या काळात तुमचे केस जास्त गळत असतील तर तुम्ही तुमच्या आहारात बदल करावा. तुमच्या आहारात व्होल ग्रेन, फळे आणि भाज्यांचा समावेश करा.कमी चरबीयुक्त आहार घ्या. तुम्ही संतुलित आहार घ्यावा. तुमच्या आहारात कोणत्याही आवश्यक पोषक घटकांचे प्रमाण कमी किंवा जास्त नसावे. पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू लागतात.ग्रीन टी प्यायल्याने केसांच्या वाढीवरही परिणाम होतो. तसेच तुमच्या आहारात फॅटी ऍसिडचा समावेश करा, कारण ते केसांचे आरोग्य राखण्यासाठी उपयुक्त आहे.

हेही पहा  –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.