Swachhata Hi Seva : सेलिब्रेटी हाती झाडू घेत रविवारी उतरणार रस्त्यावर…

156
Swachhata Hi Seva : सेलिब्रेटी हाती झाडू घेत रविवारी उतरणार रस्त्यावर…
Swachhata Hi Seva : सेलिब्रेटी हाती झाडू घेत रविवारी उतरणार रस्त्यावर…

‘स्वच्छता हीच सेवा’ (Swachhata Hi Seva) या राष्ट्रीय उपक्रम अंतर्गत उद्या रविवारी म्‍हणजे १ ऑक्‍टोबर २०२३ रोजी सकाळी १० ते ११ या एक तासाच्या वेळेत मुंबई महानगरात १७८ ठिकाणी श्रमदानातून स्‍वच्‍छता उपक्रम राबविण्‍यात येणार आहे. या स्वच्छता उपक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासह सेलिब्रेटीही हाती झाडू घेत मुंबईत स्वच्छता राखण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्यामुळे मुंबईतील अनेक भागांमध्ये चित्रपट अभिनेते हे रविवारी मुंबईतील कचऱ्याची साफ सफाई करताना दिसणार आहेत. दरम्यान, महापालिकेच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांसह कामगारांना स्वच्छतेसाठी एक तास श्रमदान (Shramdan) या उपक्रमासाठी सर्व कामगारांनी उपस्थित राहावे आणि त्याची खबरदारी सर्व खातेप्रमुखांनी घ्यावी. सर्व कर्मचाऱ्यांनी आपली उपस्थिती बायोमेट्रीक प्रणालीमध्ये नोंदवणे बंधनकारक असून या दिवशी जे कर्मचारी बायोमेट्रीक हजेरी नोंदवणार नाही त्यांची नोंद रजेविना अनुपस्थिती अशी नोंदवण्यात येणार असल्याचा फतवा सर्व विभागीय सहायक आयुक्तांनी काढलेला आहे. त्यामुळे सर्व विभागांमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांना या अभियानांमध्ये सहभागी होणे बंधनकारक केले असल्याची माहिती समोर येत आहे. (Swachhata Hi Seva)

महानगरपालिका आयुक्‍त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांच्‍या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्या निर्देशानुसार, महानगरपालिका कार्यक्षेत्रात १७८ विविध सार्वजनिक ठिकाणी श्रमदानातून स्‍वच्‍छता अभियान राबविण्‍यात येणार आहे. रविवारी म्‍हणजे १ ऑक्‍टोबर २०२३ रोजी सकाळी १० ते ११ या एक तासाच्या वेळेत मुंबई महानगरात १७८ ठिकाणी श्रमदानातून स्‍वच्‍छता उपक्रम राबविण्‍यात येणार आहे. केंद्र सरकारच्‍या गृहनिर्माण आणि शहरी व्‍यवहार मंत्रालयाने उद्या रविवार, १ ऑक्‍टोबर २०२३ रोजी सकाळी १० वाजता एक तास श्रमदानातून ‘स्‍वच्‍छता ही सेवा’ (Swachhata Hi Seva) हा उपक्रम राष्ट्रीय पातळीवर आयोजित केला आहे. मुंबईतील उपक्रमासाठी महानगरपालिकेसह मुंबई पोलिसांचाही या स्‍वच्‍छता अभियानात संयुक्त सहभाग आहे. त्यामध्ये भारताचे प्रवेशद्वार (गेटवे ऑफ इंडिया), वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान, माहीम चौपाटी, दादर समुद्रकिनारा, छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क, दादर), जुहू समुद्रकिनारा, गोराई समुद्रकिनारा यासह सर्व समुद्र किनारे आणि विविध सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या श्रमदानासाठी लोकप्रतिनिधी, सिनेसृष्टीतील तसेच मनोरंजन क्षेत्रातील कलाकार, उद्योजक, समाजातील विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवर आदी योगदान देण्यासाठी सरसावले आहेत. (Swachhata Hi Seva)

(हेही वाचा – Tara Sahdev : इस्लाममध्ये धर्मांतरासाठी दबाव आणणारा रकीबुल हसन दोषी; तारा सहदेव प्रकरणात काय म्हणाले सीबीआय न्यायालय)

या अंतर्गत सकाळी १० ते ११ या वेळेत स्वराज्यभूमी (गिरगाव चौपाटी) येथे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) हे श्रमदानातून स्वच्छतेसाठी सहभागी होणार आहेत. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, सिनेसृष्टीतील नामवंत कलावंत, प्रतिष्ठित नागरिक आदींची देखील स्वराज्यभूमीवर श्रमदानासाठी उपस्थिती राहणार आहे. तसेच याठिकाणी केंद्र आणि राज्य सरकारचे विविध विभाग, राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी), राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) तसेच इतर महाविद्यालयीन विद्यार्थी, अनिरुद्ध अकादमी आणि इतर स्वयंसेवी संघटनांचे तसेच सामाजिक संस्थांचे स्वयंसेवक देखील सहभागी होणार आहेत. सर्व मुंबईकरांनी श्रमदानामध्ये सहभागी व्हावे, यासाठी महानगरपालिका प्रशासनासह या सर्व मान्यवरांनी देखील आवाहन केले आहे. (Swachhata Hi Seva)

मराठी सिनेसृष्टी अन् बॉलिवूडचाही सहभाग-

मुंबईत श्रमदानासाठी मनोरंजन विश्वातील कलाकार, मराठी सिनेकलाकार तसेच बॉलिवूडमधील कलाकार, लेखक, दिग्दर्शक, गायक इत्यादी सहभाग घेणार आहेत. ज्यात मराठी सिनेसृष्टीतील वंदना गुप्ते, अलका कुबल, सयाजी शिंदे, सचिन खेडेकर, आदेश बांदेकर, स्वप्निल जोशी, श्रेयस तळपदे, सुनील बर्वे, अरूण नलावडे, आदिनाथ कोठारे, अभिजित केळकर, प्रसाद कांबळी आदींची उपस्थिती असणार आहे. तर बॉलिवुडमधील विश्वसुंदरी मानुषी छिल्लर, नेहा भसीन, पल्लवी जोशी, विवेक अग्निहोत्री, आफताब शिवदासानी, मधुर भांडारकर, कैलाश खेर आदी मान्यवर विविध विभाग कार्यालयांच्या वतीने आयोजित श्रमदान उपक्रमात सहभागी होणार आहेत, अशी माहिती उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) चंदा जाधव यांनी दिली आहे. (Swachhata Hi Seva)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.