Nala Wall Collapse : अंधेरी पश्चिम ते दहिसर पर्यंतच्या सर्व नाल्यांच्या भिंतींची डागडुजी, होणार एवढा खर्च

135
Nala Wall Collapse : अंधेरी पश्चिम ते दहिसर पर्यंतच्या सर्व नाल्यांच्या भिंतींची डागडुजी, होणार एवढा खर्च
Nala Wall Collapse : अंधेरी पश्चिम ते दहिसर पर्यंतच्या सर्व नाल्यांच्या भिंतींची डागडुजी, होणार एवढा खर्च

मुंबईतील अंधेरी पश्चिम ते दहिसर पर्यंतच्या अनेक नाल्यांलगतच्या भिंती पावसाळ्यात कोसळून पडण्याच्या प्रकार घडले असून या तुटलेल्या भिंतींमुळे दुर्घटना टाळण्यासाठी यासर्व भिंतीची डागडुजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या संपूर्ण भागातील नाल्यांच्या दुरुस्ती तसेच भिंतीची डागडुजी करता सुमारे २३ कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. (Nala Wall Collapse)

पश्चिम उपनगरातील गोरेगाव, मालाड आणि अंधेरी पश्चिम हा भाग दाट लोकवस्तीत येत असून या भागांमध्ये मोठे व छोटे नाले तसेच विविध रस्त्यालगतच पावसाळी पाणी वाहून जाणारे नाले आहे. तर कांदिवली, बोरीवली आणि दहिसर आदी विभागात मोठ्या प्रमाणात छोटे व मोठे नाले असून यात राजेंद्र नगर, म्हात्रे नाला, मधुपार्क नाला, चंदावरकर नाला, कॉसमॉस नाला, पंचोलिया नाला, सह्याद्री नगर नाला, अखिल नाला, गोराई व्हीलेज नाला, कुंभारकाला नाला, कोरा केंद्र नाला, एफसीआय गोडाऊन नाला, कमला नेहरू नाला, जोगळेकर नाला, समर्थवाडी नाला, व्ही. एच्. देसाई नाला, अवधुत नाला, गोबर नाला, कोकणीपाडा नाला, धसकवाडी नाला, यादव नगर नाला, इत्यादी नाले वाहतात. (Nala Wall Collapse)

या सर्व नाल्यांच्या काही भागाच्या संरक्षक भिंतीचे बांधकाम बिनथरीच्या दगडी आहे. त्यामुळे पावसाळ्यामध्ये या बिनथरीच्या दगडी बांधकामाच्या संरक्षक भिंती कोसळण्याचे प्रकार घडत असतात. त्यामुळे कोसळणाऱ्या भिंतीचे त्वरित बांधकाम करणे आवश्यक असल्याने अंधेरी पश्चिम ते दहिसर पर्यंतच्या नाल्यांच्या कोसळलेल्या संरक्षक भिंतीचे बांधकाम तसेच विविध ठिकाणांच्या नाल्यांची तथा पर्जन्य जलवाहिन्यांची तथा पेटीका वाहिन्यांची आकस्मित कामे करण्यात येणार आहे. (Nala Wall Collapse)

या भागांमधील नाल्यांमध्ये विविध ठिकाणी चेंबर व चेंबर कवर्स मोडकळीस आलेले असतात. तसेच काही नाल्यांवर कचरा टाकू नये म्हणून संरक्षक जाळी बसवावी लागते तसेच काही नाल्यांवर कचरा टाकू नये म्हणून संरक्षक जाळी बसवण्यात येणार आहे. तसेच रस्त्यालगतच्या पावसाळी पाणी वाहून नेणाऱ्या वाहिनीतील मिसिंग लिंक निर्माण करण्याचा प्रयत्नही या कामांतर्गत हाती घेण्यात येणार असल्याचे पर्जन्य जलवाहिनी विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. (Nala Wall Collapse)

(हेही पहा – Elections : लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होणार ?; यंत्रणा विकसित करण्याच्या हालचाली)

नाल्यांच्या भिंती दुरुस्तीसाठी होणारा खर्च
गोरेगाव, मालाड, अंधेरी पश्चिम परिसर

केला जाणारा खर्च : १०. ७१ कोटी रुपये

कामासाठी नेमलेल्या संस्थेचे नाव : ऍक्युट डिझाईन्स

कांदिवली, बोरीवली आणि दहिसर आदी विभाग

केला जाणारा खर्च : ११. ३३ कोटी रुपये

कामासाठी नेमलेल्या संस्थेचे नाव : ऍक्युट डिझाईन्सस

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.