Aditya-L1 Mission: आदित्य एल १ मोहिमेसंदर्भात इस्रोची मोठी अपडेट

179
Aditya-L1 Mission: आदित्य एल १ मोहिमेसंदर्भात इस्रोची मोठी अपडेट
Aditya-L1 Mission: आदित्य एल १ मोहिमेसंदर्भात इस्रोची मोठी अपडेट

आदित्य एल १ मोहिमेसंदर्भात (Aditya-L1 Mission) इस्रोने (ISTRO) मोठी अपडेट शनिवारी (३० सप्टेंबर) ट्विट केले आहे. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी गेलेल्या या यानाने पृथ्वीचं क्षेत्र ओलांडून पृथ्वीपासून ९ लाख किमीपेक्षा अधिक अंतराचा टप्पा पार केला आहे.

भारताच्या अंतराळ मोहिमेच्या इतिहासात भारतीय अंतराळ संसोधन संस्थेन अर्थात इस्रोनं दुसऱ्यांना एक अंतराळयानं पृथ्वीच्या प्रभाव क्षेत्राच्याबाहेर पाठवलं आहे. यापूर्वी मंगळ ऑर्बिटर मोहिमेवेळी त्या यानानं पृथ्वीचं प्रभावक्षेत्र भेदलं होतं. एकूणच आता आदित्य L1 मिशनमधील यान लवकरच आपल्या इच्छित लक्ष्यापर्यंत पोहोचणार आहे. PSLV C-57 या लॉन्चरच्या साहाय्यानं आदित्य एल १ कक्षेमध्ये सोडण्यात आलं आहे. सूर्य आणि पृथ्वी यांच्या L1 लॅग्रेंज पॉईंटजवळ हे यान स्थिरावेल. हा पॉईंट पृथ्वीपासून साधारण दीड मिलियन किलोमीटर अंतरावर आहे. (Aditya-L1 Mission)

 

(हेही वाचा : Mumbai Water : मुंबईकरांसाठी पाण्याचा फुल स्टॉक : वर्षभराची तहान भागणार)

सूर्य आणि त्याच्या आसपासच्या वातावरणाचा अभ्यास करणं, यामुळं शक्य होणार आहे. या अभ्यासादरम्यान ग्रहणाचाही अडथळा येऊ शकणार नाही. हे यान साधारणपणे चार महिन्यांमध्ये आपल्या नियोजित स्थळी पोहोचेल, असा अंदाज बांधण्यात वैज्ञानिकांनी मांडला आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.