Temple : ५४३ पैकी ३०० मुस्लीम खासदार लोकसभेत पाठविण्याचे षडयंत्र सुरू; पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांचा गौप्यस्फोट

हिंदुराष्ट्राच्या गप्पा मारणारे सर्वसामान्यांचा उद्धार करतील का?

255
Temple : ५४३ पैकी ३०० मुस्लीम खासदार लोकसभेत पाठविण्याचे षडयंत्र सुरू; पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांचा गौप्यस्फोट
Temple : ५४३ पैकी ३०० मुस्लीम खासदार लोकसभेत पाठविण्याचे षडयंत्र सुरू; पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांचा गौप्यस्फोट

सनातनी हिंदू समाज (sanatan Hindu Samaj) राजकीय पुढाऱ्यांच्या प्रलोभनांना बळी पडत असताना, तिकडे आपला शत्रू ५४३ पैकी ३०० मुसलमान खासदार लोकसभेत पाठविण्याचे षडयंत्र आखत आहे. राजकीय पार्ट्यांचे अजेंडे, जाहीरनामे यात अडकून न पडता आपली भूमिका ते पुढे रेटत आहेत. ३०० खासदारांच्या जोरावर इस्लामिक राष्ट्र जाहीर करायचे त्यांचे स्वप्न आहे. सैन्यदले तुमची, पोलीस तुमचे, शासकीय अधिकारी तुमचे, पण ‘हुकूमत’ आमची, असा कट शिजत असल्याचा गौप्यस्फोट ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांनी केला. (Temple)

जीएसबी टेम्पल ट्रस्ट, महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि हिंदू जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातील सावरकर सभागृहात ‘मंदिर-संस्कृती रक्षा सभा’चे आयोजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कुलश्रेष्ठ म्हणाले, आपण सध्या अशा युगात वावरत आहोत, जेथे शत्रूने आपला चेहरा, ओळख, विचार, लपवलेला नाही. याऊलट तो छातीठोकपणे सांगतो आहे की, माझ्या धर्मग्रंथात लिहिले आहे, जो माझा अल्ला आणि रसूलवर विश्वास ठेवणार नाही, त्याचा शिरच्छेद करावा. म्हणजे साऱ्या जगाचे त्यांना इस्लामिकरण करायचे आहे. त्यामुळे सनातनी हिंदू समाजाने वेळीच सावध होऊन आपली सामूहिक शक्ती दाखवायची वेळ आली आहे, असे आवाहनही त्यांनी केले. (Temple)

आपल्या मंदिरांवर कोणा विदेशी व्यक्तींनी कब्जा केलेला नाही, तर आपल्यामध्येच लपलेल्या काही लांडग्यांनी मंदिरे हडपली. सरकारने हिंदूंची मंदिरे ताब्यात घेतली, पण मस्जिद-मदारींना कधीच हात लावला नाही. त्यामुळे अशा कुप्रवृत्तींचा इलाज सर्वात आधी करायला हवा. यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी संपूर्ण सनातनी हिंदू समाजाला वेठीस धरले आहे, असा आरोपही कुलश्रेष्ठ यांनी केला.

कालानुरुप धर्मसंस्कार समजून घ्यायची पद्धत बदलली आहे. दूरसंचार क्रांतीच्या युगात आपण नव्या पिढीला १०० वर्षे जुन्या पद्धतीने धर्मसंस्कार शिकवत असू, तर कोणीतरी आपल्यावर विचार लादू पाहतोय, अशी भावना त्यांच्यात तयार होईल. सैन्यदले, पोलीस, शासकीय कर्मचारी आणि इतर सर्व क्षेत्रांमध्ये ज्याप्रकारे ड्रेसकोड आहे, त्याप्रमाणे मंदिरांमध्ये ड्रेसकोड लागू करण्याचा मुद्दा सध्या समोर येत आहे. याचा अर्थ सरकारने आपल्या संस्कृतीचे रक्षण करावे, असा आपला हेतू आहे. पण, आपल्या मुला-मुलींनी मंदिरात जाताना कोणत्या प्रकारचे कपडे परिधान करावे, याचे धडे त्यांना योग्यवेळी घरातच का नाही दिले? प्रत्येक समस्येचे निराकरण कायदे करूनच किंबहुना सरकारद्वारे व्हावे, असा विचार आपण का करतो आहोत, असा सवालही त्यांनी केला. आपल्या शत्रूकडून शिका, तो इतक्या ताकदीने उभा राहतो, की सरकार आपले नियम-कायदे त्यांच्यासाठी बदलते. कारण तो सामूहिक ताकदीचा अवलंब करतो, असेही ते म्हणाले.

भारत हिंदूराष्ट्र व्हावे, अशी इच्छा प्रत्येकाच्या मनात आहे. पण, त्याची घोषणा सरकारने करण्याची वाट आपण पाहत आहोत. भारत हिंदूराष्ट्र झाल्याने आपल्यामधले दलाल संपतील का? सध्या राजकीय पक्षांमध्ये सध्या चोर इतके वाढले आहेत, की प्रत्येक पातळीवर ते प्रलोभनाचे राजकारण खेळत आहेत. सर्वसामान्यांना अपेक्षित मुद्द्यांना हात न घालता, अन्य मार्गांनी मत खरेदीचा प्रयत्न ते करताना दिसत आहेत. आपल्याला वाटते, की हिंदुराष्ट्राच्या मोठमोठ्या गप्पा करतात, म्हणजे ते आपला उद्धार करतील. पण, तो आपला गैरसमज आहे. जगात असा कोणताच देश नाही, जो राजकीय नेते वा पक्षांनी बदलला. सरकारचे काम असते देश चालवणे. आज सरकार आणि प्रशासनात ९० टक्क्यांहून अधिक हिंदू आहेत. पण गेल्या ७५ वर्षांत सनातनी हिंदूंच्या आयुष्यात काही बदल घडला का, याचा विचारही आपण करायला हवा, असे पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ म्हणाले.

(हेही वाचा : Bank : अबब…टॅक्सी चालकाच्या खात्यात जमा झाले ९ हजार कोटी)

दिल्लीत पाचवेळा अजान देणाऱ्यांना २० हजारांचे बक्षिस

दिल्लीत एका छोट्याशा पार्टीचे सरकार आहे. तेथील ७० आमदारांपैकी ६९ हिंदू आहेत. केवळ १ मुस्लीम आहे. या सरकारने अलिकडेच एका असैविधानिक बाबीला मंजुरी दिली, की दिल्लीत जेवढ्या मस्जिद आहेत, त्यात दिवसातून ५ वेळा अजान देईल, त्याला महिन्याला २० हजारांची बक्षिसी दिली जाईल. या मुद्द्यावर ना कोणा आमदाराने आवाज उठवला, ना विरोध केला, ही बाब गंभीर असल्याकडे कुलश्रेष्ठ यांनी लक्ष वेधले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.