गोकुळच्या म्हशीच्या (Gokul milk) दुधाच्या दरात लवकरच वाढ होणार असल्याची माहिती समोर आली आहे. रविवार, १ ऑक्टोबरपासून प्रतिलिटरमागे दीड रुपयाने म्हशीच्या दुधाचा दर डेअरीने (Dairy) वाढवला आहे.
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाकडून (Kolhapur District Co-operative Milk Producers’ Unions) गोकुळ ब्रँण्डखाली (Gokul Brand) मुंबईत दररोज आठ लाख लिटर दुधाचे वितरण केले जाते. सध्या म्हशीच्या दुधाची कमी झालेली उपलब्धता आणि चाऱ्याच्या किमती वाढल्याने शेतकऱ्यांकडून खरेदी केल्या जाणाऱ्या दुधाच्या दरात दीड रुपयांची वाढ केली आहे, तर गाईच्या दुधाच्या (cow milk) खरेदी दरात प्रतिलिटरमागे दोन रुपयांची कपात केली आहे.
(हेही वाचा – Kokan Railway : मालगाडी घसरल्याने कोकण रेल्वे वाहतूक विस्कळीत)
मुंबईतील तबेलाधारकांनी चाऱ्याच्या वाढलेल्या किमतीचे कारण देत नुकतीच म्हशीच्या दुधाच्या दरात प्रतिलिटरमागे एक रुपयाची वाढ केली आहे. त्यातच आता गोकुळने शेतकऱ्यांकडून खरेदी केल्या जाणाऱ्या दुधाला दीड रुपयाची दरवाढ दिल्याने त्याची वसुली विक्री दरात वाढ करून केली जाण्याची शक्यता आहे.
Join Our WhatsApp Community