मागील तीन चार दिवसांपासून पुन्हा पावसाने (Monsoon Update) आपली हजेरी लावली आहे. अशातच आजही म्हणजेच रविवार १ ऑक्टोबर रोजी ठाणे मुंबईसह कोकणात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या सुरुवातीच्या दिवसांत दडी मारून बसलेला पाऊस (Monsoon Update) राज्यात पुन्हा एकदा सक्रिय झालेला पाहायला मिळत आहे.
अशातच आता हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, ठाण्यात पावसाच्या (Monsoon Update) हलक्या सारी कोसळतील. तर कोकणाला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. IMD म्हणजेच भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, आणि गोव्यात मुसळधार पाऊस (Monsoon Update) होण्याची शक्यता आहे.
आज राज्यातील अनेक ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन (Monsoon Update) देखील करण्यात आले आहे.
1 Oct, 12.15 night latest satellite obs
Rtn Sindhudurg Goa Raigad to be watched pl for very intense rainfall during next 3,4 hrs.
Watch for local floodings, possibilities of land/mud slides & strong water flows from slopes …during next 3,4 hrs.
Mumbai Thane too ☁☁ pic.twitter.com/oQ42S2zdhl— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 30, 2023
(हेही वाचा – LPG Commercial Gas Cylinders : महिन्याच्या पहिल्याच दिवशी सिलिंडरच्या किमतींत लक्षणीय वाढ)
मान्सूनचा परतीचा प्रवास…
हवामान विभागाने (Monsoon Update) दिलेल्या माहितीनुसार, आज म्हणजेच मंगळवार २६ सप्टेंबर पासून मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला (Monsoon Update) सुरुवात होणार असून, उत्तर भारतापासून याची सुरुवात होणार आहे. तसेच राजस्थानच्या काही भागांतून नैऋत्य मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरु होणार आहे. महाराष्ट्रात मान्सूनचं आगमनच उशिरा झाल्यामुळे त्याच्या परतीचा प्रवासही (Monsoon Update) उशिराने म्हणजेच १०ऑक्टोबरनंतर सुरु होणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.
थोडक्यात एकीकडे राज्यात सध्या मान्सूनचाच पाऊस (Monsoon Update) सुरु असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. तर दुसरीकडे देशाच्या उत्तरेकडे आतापासूनच हवामान बदलण्यास सुरुवात झाली असून, थंडीची हलकी चाहूल लागण्यास सुरुवात झाली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community