Asian Games 2023 : स्पर्धेच्या आठव्या दिवशी रौप्य पदक मिळवून देशाने रचला ‘हा’ नवा इतिहास

132
Asian Games 2023 : स्पर्धेच्या आठव्या दिवशी रौप्य पदक मिळवून देशाने रचला 'हा' नवा इतिहास

होआंगझाओ इथं सुरू असलेल्या आशियाई खेळांचा (Asian Games 2023) आज म्हणजेच रविवार १ ऑक्टोबर हा आठवा दिवस आहे. अशातच आज दिवसाच्या सुरुवातीलाच भारताने रौप्य पदक मिळवत एक नवीन विक्रम केला आहे. देशाने गोल्फ या क्रीडा प्रकारात रौप्य पदक पटकावले आहे. खेळाडू अदिती अशोक ही गोल्फ या क्रीडा प्रकारात पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. भारताच्या खात्यात आतापर्यंत १० सुवर्ण, १५ रौप्य आणि १४ कांस्य अशी एकूण ३९ पदकं आहेत.

अधिक माहितीनुसार, रौप्य पदक मिळवून आदितीने (Asian Games 2023) नवीन विक्रम केला आहे. गोल्फ या क्रीडाप्रकारात २०२१ च्या जपान ऑलिम्पिक स्पर्धेत आदितीचं थोडक्यासाठी पदक हुकलं होता. मात्र आता अदितीने जिद्दीने आणि आपल्या मेहनतीने आशिया क्रीडा (Asian Games 2023) प्रकारात रौप्य पदक मिळवून एका नव्या विक्रमाची नोंद केली आहे.

(हेही वाचा – Asian Games 2023 : हॉकीमध्ये टीम इंडियाची ऐतिहासिक कामगिरी, पाकिस्तानचा दणदणीत पराभव)

भारताच्या खात्यात आतापर्यंत (Asian Games 2023) १० सुवर्ण, १५ रौप्य आणि १४ कांस्य अशी एकूण ३९ पदकं आहेत. त्यातील नेमबाजी या स्पर्धेत ६ सुवर्ण, ८ रौप्य आणि ५ कांस्यपदकांसह १९ पदके जिंकली आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.