राज्यामध्ये स्वाईन फ्लूसह इन्फ्लूएन्झाच्या (Influenza) रुग्णांमध्येही वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. जानेवारी ते सप्टेंबर या ९ महिन्यांमध्ये या आजारामुळे १८ जणांना प्राण गमवावे लागले आहेत.
याशिवाय या आजारामुळे डोळे येणे, स्वाईन फ्लू, लेप्टोस्पायरोसिस, डेंग्यू, मलेरिया आणि कॉलरा या आजारामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ३५ इतकी आहे.
मुंबईत ९ महिन्यांत स्वाईन फ्लूच्या १ हजार ६६८ रुग्णांची नोंद झाली आहे, तर ठाण्यात ५५२, पुणे येथे ३२० जणांना बाधा झाली. लेप्टोस्पायरोसिसमुळे (Leptospirosis) सप्टेंबरपर्यंत आठ जणांना प्राण गमवावे लागले असून, मुंबईमध्ये १ हजार २१८, रायगड येथे २५ तर ठाण्यात २८ जणांना लेप्टोची लागण झाली आहे. डेंग्यु, चिकनगुनिया, इन्फ्लुएन्झा, मलेरिया या आजारांचा प्रादुर्भाव मुंबईमध्ये वाढत असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
(हेही वाचा – Gokul milk : गोकुळच्या दुधाचा दर वाढण्याची शक्यता, खरेदी दरात झाली वाढ)
साथीचा जोर वाढला (Epidemic Diseases)
वातावरणातील बदलामुळे आर्द्रता वाढता. यामुळे साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव वाढतो. विषाणु, जीवाणूंच्या वाढीला पोषक हवामान मिळाल्याने आजारांचा संसर्ग वाढतो त्याशिवाय साचलेल्या पाण्यावरील डासांमुळेही विविध आजारांचा संसर्ग होतो. अनेक प्रकारचे विषाणू नाकाद्वारे शरीरात जातात. त्यामुळे फ्लूचा आजार होऊ शकतो. सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे शरीरात जाणवू लागतात. याशिवाय अंगदुखी, स्नायूदुखी, डोकेदुखी, छातीत जळजळ होणे, घसादुखी, कोरडा खोकला असे त्रास होतात. फ्लू दोन आठवड्यापर्यंत राहतो.
उपाय
– फ्लूचा आजार झालेल्या व्यक्तिचा संपर्कात जाणं टाळा.
– इन्फ्लूएंझा झालेल्या व्यक्तिंनादेखील सार्वजनिक ठिकाणी किंवा गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा.
– इन्फ्लूएंझा हवेतून पसरतो. त्यामुळे तातडीने यावर औषधोपचार करा.
– स्वच्छता राखा, हाताद्वारे अन्नपदार्थ खाताना पोटात जंतू जाण्याची शक्यता असते. त्यामुळे हात स्वच्छ धुवूनच अन्नपदार्थ खा. हात साबणाने स्वच्छ धुवा.
– डोळे, नाक अथवा तोंडाला स्पर्श करू नका.
– रोगप्रतिकारशक्ती चांगली राहण्यासाठी पुरेशी झोप, पाण्याचे भरपूर सेवन, सकस आहार, नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे.