छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला संपवण्यासाठी वापरलेली वाघनखे येत्या १६ नोव्हेंबरला मुंबईत येणार आहेत. याकरिता लंडनमधील व्हिक्टोरिया आणि अलबर्ट वस्तुसंग्रहालयासोबत (Victoria and Albert Museum) ३ नोव्हेंबरला करार होणार आहे. या वाघनखांवरून (tiger claw) सध्या राजकीय वादळ (political storm) उठत आहे.
वाघनखे मुंबईत आणण्यावरून शिवसेना आमदार आदित्य ठाकरे (ShivSena MLA Aditya Thackeray) आणि खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी केलेल्या प्रश्नावर ‘त्यांच्या बोलण्याचं मला आश्चर्य वाटत नाही, कारण संजय राऊतांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांनाच पुरावे मागितले होते. त्यामुळे ही त्यांची परंपरा आहे ,’ अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे. (devendra fadnavis criticism)
(हेही वाचा – Traffic jam : सायन-पनवेल महामार्गावर वाहतूक कोंडी )
तसेच त्यानंतर पुढे आदित्य ठाकरे यांच्याविषयी बोलतान ते म्हणाले की, ‘मी बालबुद्धीवर काय बोलणार. त्यामुळे यावर उत्तर देत नाही.’ अशा प्रकारे आदित्य ठाकरेंच्या प्रश्नांना बालबुद्धी, असे म्हणत बोचरी टीका केली आहे.
वाघनखे शिवकालिन आहेत का? ती खरी आहेत का ? असे प्रश्न आदित्य ठाकरे यांनी सरकारला विचारले आहेत. ही वाघनखे सध्या लंडनच्या व्हिक्टोरिया अँण्ड अल्बर्ट वस्तु संग्रहालयात ठेवण्यात आली आहेत. पुढील तीन वर्षासाठी वाघनखे महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
हेही पहा –