आपल्या देशात क्रिकेट हा फक्त खेळ नसून तो अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय झाला आहे. प्रत्येक क्रिकेट (Bangladesh Celebrity Cricket League) चाहत्याला आयुष्यात एकदातरी आपण प्रोफेशनल क्रिकेट सामना खेळावा असं वाटत असत. यामुळेच सेलिब्रेटी क्रिकेट लीगची सुरुवात झाली. कलाकारांना देखील प्रोफेशनल क्रिकेट खेळता यावं हा या लीगमगील मुख्य हेतू आहे.
अशातच क्रिकेट (Bangladesh Celebrity Cricket League) सामन्यांमधला ‘स्लेजिंग’ या प्रकारची आपल्याकडे फार चर्चा रंगते. सामना दरम्यान दोन संघांमधील चिडवाचिडवी याला स्लेजिंग म्हणतात. दरम्यान बांगलादेशातील सेलिब्रिटी क्रिकेट लीगमध्ये या स्लेजिंग प्रकाराचं राड्यात रूपांतर झालं आहे. यामध्ये ६ खेळाडू गंभीर जखमी झाले आहेत.
Celebrity Cricket League has turned into WWE Royal Rumble. 😂
– 6 people got injured
– Tournament got cancelled before semis30+ year old male & female adults fighting over boundary & out decision in a ‘friendly’ tournament. 🤣 pic.twitter.com/FOAxEI00rz
— Saif Ahmed 🇧🇩 (@saifahmed75) September 30, 2023
(हेही वाचा – MLA Kunal Patil : काँग्रेस आमदार कुणाल पाटील यांच्या सूतगिरणीवर छापा)
नेमका प्रकार काय?
ज्या सामन्यात हा सगळा प्रकार घडला तो सामना (Bangladesh Celebrity Cricket League) बांगलादेश सेलिब्रिटी क्रिकेट लीग मधील अतिशय महत्वाचा सामना असल्याचे सांगितले जात आहे. या सामन्यात पंचाच्या म्हणजेच अंपायरच्या निर्णयावरून चित्रपट निर्माता मुस्तफा कमाल राज आणि दीपंकर दीपोन यांच्यात वाद झाले. मात्र काही वेळेनंतर या वादाचे हृदयामध्ये रूपांतर झाले. (Bangladesh Celebrity Cricket League) दोन्ही संघामध्ये हाणामारी झाली. खेळाडू एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत होते. या सर्व घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
या सर्व हाणामारीत सहा खेळाडू गंभीर जखमी झाली आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community