१९व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत(Asian Games 2023) भारताने नेमबाजीत आपली स्वप्ने कायम ठेवली कारण सरबज्योत सिंग आणि दिव्या टीएस यांनी आणखी एका पदकाची भर घातल्याने दलाच्या पदकांची संख्या १९ (सहा सुवर्ण, आठ रौप्य आणि पाच कांस्य) झाली. सरबजोत आणि दिव्याला सुवर्णपदक जिंकणाऱ्या चीनच्या बोवेन झांग आणि रँक्सिन जियांग यांच्याकडून अंतिम फेरीत हरवून रौप्यपदक मिळवले. (Asian Games 2023)
भारताच्या नेमबाजांनी चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये पदकांची लयलूट सुरूच ठेवली आहे. नेमबाजीच्या मेन्स टीम इव्हेंट ट्रॅप शूटिंगमध्ये भारताच्या के. चेनाई, पृथ्वीराज आणि जोरावर सिंह यांनी सुवर्णपदकावर निशाणा साधला आहे. भारताने या स्पर्धेत नेमबाजीमध्ये जिंकलेले हे सातवे आणि एकूण ११वे पदक ठरले आहे.के. चेनाई, पृथ्वीराज टोंडिमन आणि जोरावर सिंह यांनी अंतिम फेरीत अचूक निशाणा साधताना भारताच्या खात्यात आणखी एका सोनेरी पदकाची भर टाकली. (Asian Games 2023)
(हेही वाचा : India vs Canada : ब्रिटनमध्ये भारतीय उच्चायुक्तांसोबत गैरवर्तन, भारताकडून संताप व्यक्त)
त्याबरोबरच या स्पर्धेत भारताने जिंकलेल्या पदकांची संख्या ४१ वर पोहोचली आहे. भारताच्या राजेश्वरी कुमारी, मनीषा कीर आणि प्रीति रजक यांच्या त्रिकुटाने वुमेन्स टीम ट्रॅप शूटिंगमध्ये रौप्यपदक जिंकले आहे.
Join Our WhatsApp Community