गेल्या काही दिवसांपासून भारत आणि कॅनडा (India vs Canada) यांच्यात वाद सुरु आहे. खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येनंतर या वादाला सुरुवात झाली. निज्जरच्या हत्येमागे भारताचा हात असल्याचा आरोप कॅनडाने केला, तेव्हापासून दोन्ही देशाचे संबंध कमालीचे ताणले गेले. यावेळी दोन्ही देशांकडून वेगवेगळे निर्णय घेतले गेले. मात्र आता या वादाचे पडसाद थेट ब्रिटनमध्ये उमटले आहेत.
नेमका प्रकार काय?
ब्रिटनमधल्या काही खलिस्तानींनी (India vs Canada) भारतीय उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी यांना तिथल्या गुरुद्वारामध्ये प्रवेश नाकारण्यात आला. तसेच त्यांच्या कारमध्ये जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला. या सर्व प्रकारावर आता भारताने संताप व्यक्त केला आहे. तसेच क्रम दोराईस्वामी यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात यावी अशी मागणी केली असून भारताने ब्रिटिश परराष्ट्र मंत्रालय आणि पोलिसांकडे (India vs Canada) याप्रकरणी तक्रार केली आहे.
(हेही वाचा – Manipur Violence : जातीय हिंसाचार नव्हे, हे तर म्यानमारचे भारताविरुद्धचे युद्ध; एनआयएचे मोठे खुलासे)
तक्रार नोंदवतांना भारताने नमूद केलं की, “हा संपूर्ण मुद्दा शीख समुदायाच्या विरोधात आहे असं मानत नाही, परंतु तो फक्त शीख (India vs Canada) समुदायातील काही कट्टरवाद्यांचा मुद्दा मानतो.”
दरम्यान ब्रिटनच्या उच्च मंत्र्यांनी विक्रम दोराईस्वामी (India vs Canada) यांच्यासोबत झालेल्या घटनेबद्दल चिंता व्यक्ती केली. ते म्हणाले की, “परदेशी मुत्सद्दी आणि यूकेमधील प्रार्थनास्थळं सर्वांसाठी खुली असणं अत्यंत महत्त्वाचे आहे.”
हेही पहा –
Join Our WhatsApp Community