पाकिस्तानने पेरलेला आतंकवाद आता त्याच्यावरच उलटत आहे. (Pakistan) पाकिस्तानमध्ये २९ सप्टेंबर रोजी बलुचिस्तानच्या मस्तुंग जिल्ह्यातील मदिना मशिदीजवळ ईदच्या दिवशी २ आत्मघातकी स्फोट झाले. या दोन्ही स्फोटात ६५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर शेकडो लोक जखमी झाले. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या २ स्फोटानंतर शनिवारी पाकिस्तानने भारतावर गंभीर आरोप केले. या आत्मघातकी स्फोटामागे भारतीय गुप्तचर संस्था ‘रॉ’चा हात असल्याची ओरड पाकिस्तानने केला होती. (Pakistan)
(हेही वाचा – Wolf Conservation : राज्यात लांडगा संवर्धनासाठी ‘पुणे मॉडेल’ राबवणार, जाणून घ्या खास काय आहे प्लॅन)
“मस्तुंग येथील आत्मघातकी बॉम्बस्फोटात सामील असलेल्या घटकांना पाकिस्तानी लष्कर आणि इतर सर्व संस्थांकडून जशास तसे उत्तर दिले जाईल. (Pakistan) या हल्लात RAW सामील आहे,” असे पाकिस्तानचे गृहमंत्री म्हणाले. शनिवारी पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी विभागाने (सीटीडी) अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास सुरू असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही, अशी माहिती सीटीडीने दिली.
या दोन आत्मघातकी स्फोटांनंतर पाकिस्तानचे गृहमंत्री सरफराज बुगती यांनी भारतावर गंभीर आरोप केला. त्यांनी या आत्मघातकी स्फोटामागे भारताची गुप्तचर संस्था ‘रिसर्च अँड अॅनालिसिस विंग’ अर्थात ‘रॉ’चा हात असल्याचा दावा केला.
मदिना मशिदीजवळच्या स्फोटात सुमारे ६० जणांचा मृत्यू झाला, तर ६० हून अधिक लोक गंभीर जखमी झाले. पोलिसांच्या वाहनांजवळच हा स्फोट घडला. या स्फोटानंतर अवघ्या काही तासांत खैबर पख्तूनख्वाच्या हंगू शहरातील एका मशिदीत आणखी एक स्फोट झाला. यामध्ये किमान ५ लोकांचा मृत्यू झाला, तर काही लोक जखमी झाले. (Pakistan)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community