Tourism Corporation : कोरोनानंतर पर्यटन क्षेत्राला चालना मिळण्यासाठी नवा प्रयोग,’रिसॉर्ट’चा संपूर्ण कारभार महिलाच पाहणार

पर्यटन क्षेत्रात लिंगभाव समानता आणणारे धोरण महाराष्ट्र सरकारने देशात पहिल्यांदा आखले

120
Tourism Corporation : कोरोनानंतर पर्यटन क्षेत्राला चालना मिळण्यासाठी नवा प्रयोग,'रिसॉर्ट'चा संपूर्ण कारभार महिलाच पाहणार
Tourism Corporation : कोरोनानंतर पर्यटन क्षेत्राला चालना मिळण्यासाठी नवा प्रयोग,'रिसॉर्ट'चा संपूर्ण कारभार महिलाच पाहणार

महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाच्या (Tourism Corporation) ३० पैकी ३ रिसॉर्टचा संपूर्ण कारभार आता महिलांच्या हाती दिला जाणार आहे. छत्रपती संभाजीनगर, नागपूर, खारघर येथील रिसॉर्टमध्ये व्यवस्थापकापासून ते सेवा देणारे कर्मचारी आणि सुरक्षा रक्षक महिलाच असतील.

नोव्हेंबर महिन्यापासून या नियमाची अंमलबजावणी केली जाणार आहे. याशिवाय पर्यटन महामंडळाच्या (Maharashtra State Tourism Corporation)  रिसॉर्टमधून आता जेवणातून कृत्रिम रंग आणि अजिनोमोटोसारख्या पदार्थांचा वापर बंद करण्यात आला आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाच्या संचालक श्रद्धा जोशी (Director Shraddha Joshi) यांनी दिली आहे.

कोरोनानंतर पर्यटनाला चालना देण्यासाठी ….
कोरोनानंतर पर्यटनाला चालना (Promotion of tourism after Corona) देण्यासाठी हा प्रयत्न करण्यात येत आहे. याकरिता काही नवीन प्रयोग करण्यात येणार आहेत. पर्यटन क्षेत्रात लिंगभाव समानता आणणारे धोरण महाराष्ट्र सरकारने देशात पहिल्यांदा आखले आणि स्वीकारण्यात आले आहे. कोरोना महामारीच्या काळात तीन ते पाच कोटी रुपयांमध्ये तोट्यात असणारे मंडळ आता ९ कोटी रुपयांपेक्षा जास्त नफ्यात आहे. याकरिता पायाभूत सुविधांमध्ये वाढ, सेवांमधील त्रुटी दूर करणे आणि ग्राहकांच्या मनाला शांतता लाभेल असे नवनवे उपक्रम आखले जात आहेत. याकरिता साहसी खेळ, आकाश दर्शन यासारखे उपक्रमही हाती घेण्यात आले आहेत.

(हेही वाचा  – Afghanistan : अफगाणिस्तानचा भारतातील दूतावास बंद; सांगितली ‘ही’ कारणे)

नव्या प्रयोगातलं वेगळेपण…
१२ मध्यम श्रेणीतील कर्मचारी, ३५ सेवा क्षेत्रातील महिलांची नेमणूक या नव्या प्रयोगाअंतर्गत करण्यात आली आहे. यामध्ये रिसॉर्ट चालवणाऱ्यांपासून, व्यवस्थापक, टॅक्सी चालवणाऱ्याही महिलाच असणार आहेत तसेच आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे, याकरिता रिसॉर्टमधील खाद्यपदार्थांत कोणताही कृत्रिम खाद्यपदार्थ वापरला जाणार नाही. याकरिता गेल्या ६ महिन्यांपासून मोहीमही राबवली जात आहे. याकरिता भाज्यांची शेती करण्यावरही भर दिला जाणार आहे, असेही श्रद्धा जोशी म्हणाल्या.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.