Gyanvapi Case : ज्ञानवापी संकुलातील व्यास तळघराच्या हस्तांतरणाबाबत सुनावणी पूर्ण

ज्ञानवापी परिसरातील व्यास महर्षींच्या तळघराच्या हस्तांतरणाबाबत वाराणसीच्या जिल्हा न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली आहेत. 4 ऑक्टोबरला निर्णय येणार आहे.

160
Gyanvapi Case : ज्ञानवापी संकुलातील व्यास तळघराच्या हस्तांतरणाबाबत सुनावणी पूर्ण
Gyanvapi Case : ज्ञानवापी संकुलातील व्यास तळघराच्या हस्तांतरणाबाबत सुनावणी पूर्ण

वाराणसीच्या जिल्हा न्यायालयाने ३० सप्टेंबर रोजी ज्ञानवापी परिसरात असलेल्या व्यास तळघराच्या चाव्या वाराणसीच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे सोपवण्याची विनंती करणारी याचिका दाखल करण्यात आली आहे. (Gyanvapi Case) त्यावर शनिवारी सुनावणी पूर्ण करताना जिल्हा न्यायाधीश ए.के.विश्वेश यांनी 4 ऑक्टोबरपर्यंत निर्णय राखून ठेवला. व्यास तळघरात पूजा करण्याचा अधिकार देण्याबाबतचा खटला दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ विभाग) नितीशकुमार सिन्हा यांच्या न्यायालयात चालू आहे. या प्रकरणी जिल्हा सरकारी वकील राजेश मिश्रा यांनी सांगितले की, गेल्या सोमवारी हे प्रकरण जिल्हा न्यायाधिशांच्या न्यायालयात हस्तांतरित करण्यासाठी अर्ज करण्यात आला होता. त्यावर जिल्हा न्यायाधीश ए.के.विश्वेश यांनी सुनावणी करताना मंदिर ट्रस्टच्या विश्वस्तांना आपली बाजू मांडण्यासाठी 30 सप्टेंबरची तारीख निश्चित केली होती. (Gyanvapi Case)

(हेही वाचा – Tourism Corporation : कोरोनानंतर पर्यटन क्षेत्राला चालना मिळण्यासाठी नवा प्रयोग,’रिसॉर्ट’चा संपूर्ण कारभार महिलाच पाहणार)

हिंदू पक्षाचे वकील मदन मोहन यादव यांनी सांगितले की, आज काशी विश्वनाथ मंदिर ट्रस्टच्या वकिलांनी जिल्हा न्यायालयात आपली बाजू मांडली. काशी विश्वनाथ मंदिर ट्रस्टचे वकील रवी पांडे यांनी न्यायालयासमोर सांगितले की, हस्तांतरण अर्ज स्वीकारार्ह आहे. मंदिर ट्रस्टचा या अर्जावर कोणताही आक्षेप नाही. ज्ञानवापी परिसरात नंदीच्या दर्शनी भागासमोर व्यास तळघर आहे. 1993 मध्ये त्यावर बॅरिकेड्स लावून सरकारने पूजा थांबवली होती. 1993 पूर्वी या तळघराचा वापर पुजारी सोमनाथ व्यास करत होते. (Gyanvapi Case)

पूजा सुरू ठेवता यावी

हिंदू पक्षाने या प्रकरणी दावा दाखल केला आहे. या अंतर्गत ज्ञानवापी वादावर निर्णय होईपर्यंत तळघर जिल्हा दंडाधिकार्‍यांकडे सोपवण्याची विनंती केली आहे. नंदीसमोरील बॅरिकेटिंग हटवून तळघरात जाण्यासाठी रस्ता तयार करावा, जेणेकरून तेथे पूजा सुरू ठेवता येईल, अशी मागणी हिंदू पक्षाने केली आहे. 30 सप्टेंबर रोजी विश्वनाथ मंदिर ट्रस्टच्या वकिलांनी आपली तयारी पूर्ण नसल्याचे कारण देत आणखी वेळ देण्याची विनंती केली, त्यानंतर जिल्हा न्यायाधिशांनी ३० सप्टेंबर रोजी सुनावणी निश्चित केली होती.

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग (ASI) येथील काशी विश्वनाथ मंदिराशेजारी असलेल्या ज्ञानवापी मशीद संकुलाचे वैज्ञानिक सर्वेक्षण करत आहे. (Gyanvapi Case)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.