Swachata Hi Seva : स्वच्छता हीच सेवा यापुढे जनचळवळ व्हावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयोजित 'स्वच्छता हीच सेवा' अभियानात हजारो मुंबईकरांनी श्रमदान करून ठेवला आदर्श.

136
Swachata Hi Seva : स्वच्छता हीच सेवा यापुढे जनचळवळ व्हावी” - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Swachata Hi Seva : स्वच्छता हीच सेवा यापुढे जनचळवळ व्हावी” - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

‘स्वच्छता हीच सेवा’ (Swachata Hi Seva) हा उपक्रम केवळ छायाचित्र काढण्यासाठीचा उपक्रम नसून, यातून आपण संपूर्ण महाराष्ट्र राज्यात एक जनचळवळ उभी करत आहोत. त्यामुळे प्रत्येकाने हातात झाडू घेऊन स्वच्छता मोहिमेसाठी रस्त्यावर उतरायला हवे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आपल्या देशातील सार्वजनिक स्वच्छतेसाठी सुरु केलेला “एक तारीख, एक तास” हा उपक्रम म्हणजे आपल्यासाठी सुंदर महाराष्ट्र, सुंदर भारत बनविण्यासाठी आपण टाकलेले मोठे पाऊल आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केले.

केंद्र सरकारच्‍या ‘स्‍वच्‍छता ही सेवा’ या राष्ट्रीय उपक्रम अंतर्गत रविवारी ( १ ऑक्टोबर २०२३) सकाळी १० ते ११ या वेळेत मुंबईत महानगरपालिकेच्या वतीने १७८ ठिकाणी जनसहभागातून स्वच्छता श्रमदान करण्यात आले. त्याचा एक भाग म्हणून स्वराज्यभूमी (गिरगाव चौपाटी) येथे आयोजित प्रमुख कार्यक्रमात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री शिंदे हे बोलत होते.याप्रसंगी प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांनी जेव्हा पहिल्यांदा लाल किल्ल्यावरून स्वच्छ भारत अभियानाची घोषणा केली आणि ते स्वत: झाडू घेऊन रस्त्यावर उतरले, तेव्हा अनेकांनी त्यावर टीका केली. पण सगळी जनता जेव्हा या अभियानात उतरली आणि त्यातून इतिहास रचला गेला, तो अवघ्या जगाने पाहिला आणि टीकाकारांची तोंडं बंद झाली. प्रधानमंत्री महोदय म्हणतात त्याप्रमाणे, स्वच्छता हा काही केवळ एक दिवस आणि कुणीतरी एकानेच राबविण्याचा उपक्रम नाही, तर ती नेहमीसाठीची आपली जीवनशैली असली पाहिजे. राज्यातील गडकिल्ले, धार्मिक स्थळे, मंदिरे यांच्या परिसरात देखील स्वच्छता असली पाहिजे. ही तीर्थक्षेत्रे सुंदर दिसली पाहिजेत, यासाठी देखील सर्वांनी सहभागी होऊन योगदान द्यावे, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी नमूद केले.

यांचाही होता सहभाग
स्वराज्यभूमी वरील श्रमदानामध्ये महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार मंगेश कुडाळकर, इस्रायलचे भारतातील वाणिज्यदूत कोब्बी शोशानी, नॉर्वेचे भारतातील वाणिज्यदूत अर्ने जॅन फ्लोलो, तसेच राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव के. एच. गोविंदराज, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी, तटरक्षक दलाचे पश्चिम विभागाचे महासंचालक कैलाश नेगी, नौदलाचे व्हाइस एडमिरल दिनेश त्रिपाठी, माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर, उपायुक्त (परिमंडळ १) संगीता हसनाळे, उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) चंदा जाधव तसेच अभिनेते नील नितीन मुकेश, पद्मिनी कोल्हापुरे, सुबोध भावे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच स्थानिक प्रतिष्ठित नागरिक, आदी यात सहभागी झाले होते. केंद्र आणि राज्य सरकारचे विविध विभाग, राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी), राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस), वेगवेगळ्या स्‍वयंसेवी संस्‍था – संघटना, खासगी- सहकारी बॅंका, अंगणवाडी कर्मचारी, विविध व्‍यापारी संघटना तसेच इतर महाविद्यालयीन विद्यार्थी, अनिरुद्ध अकादमी, नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान आणि इतर स्वयंसेवी संघटना व संस्थांचे स्वयंसेवक यांनीदेखील येथे सहभागी होऊन स्वच्छता श्रमदान केले.

शिवडी किल्ला येथे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे श्रमदान-
छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त व त्यासोबत स्वच्छता हीच सेवा उपक्रम यांचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाने संपूर्ण महाराष्ट्रात गड-किल्ले स्वच्छता अभियानाचे आयोजन केले आहे. त्याचा भाग म्हणून        उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवडी किल्ला येथे श्रमदान करुन या अभियानाचा शुभारंभ केला. यावेळी विधानसभा अध्यक्ष  राहूल नार्वेकर, कौशल्य, उद्योजकता, रोजगार व नाविन्यता विभागाचे मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री  मंगल प्रभात लोढा यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, ‘स्वच्छता हीच सेवा’ या उपक्रम अंतर्गत महानगरपालिका आयुक्‍त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांच्‍या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्या निर्देशानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मुंबई महानगरात १७८ ठिकाणी आज श्रमदानातून स्वच्छता उपक्रम संपन्न झाला. त्यामध्ये अभियानात असंख्य मुंबईकरांनी श्रमदान करत देशवासीयांसमोर आदर्श प्रस्थापित केला. विविध ठिकाणी आयोजित श्रमदानासाठी लोकप्रतिनिधी, मनोरंजन विश्वातील कलाकार, मराठी सिनेकलाकार तसेच बॉलिवूडमधील कलाकार, लेखक, दिग्दर्शक, गायक आदींनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.

(हेही वाचा : Anti India Slogans In JNU : जेएनयूमध्ये पुन्हा देशविरोध उफाळला; पंतप्रधानांची कबर खोदण्याची भाषा)

लोकप्रतिनिधींचा सहभाग
आजच्‍या स्‍वच्‍छता श्रमदान मोहिमेत केंद्रीय सूक्ष्‍म, लघू व मध्‍यम उद्योग मंत्री नारायण राणे, विधानसभा अध्‍यक्ष राहुल नार्वेकर, खासदार . गोपाळ शेट्टी, खासदार गजानन कीर्तीकर, खासदार पूनम महाजन, खासदार मनोज कोटक, आमदार आशीष शेलार, आमदार अतुल भातखळकर, आमदार प्रसाद लाड, आमदार . प्रवीण दरेकर, आमदार मंगेश कुडाळकर, आमदार पराग अळवणी, आमदार विद्या ठाकूर, आमदार भारती लव्‍हेकर, आमदार अबू आझमी, आमदार राजहंस सिंह, आमदार दिलीप लांडे, आमदार सुनील शिंदे, आमदार योगेश सागर, आमदार अमीत साटम, आमदार मिहीर कोटेचा, आमदार कालिदास कोळंबकर, आमदार पराग शहा आदी लोकप्रतिनिधी सहभागी झाले होते.

मराठी – हिंदी चित्रपटसृष्‍टीतील कलाकारांचा उत्‍स्‍फूर्त सहभाग-
सलीम खान, अनुपम खेर, उदित नारायण, सुनील शेट्टी, . तुषार कपूर, अरबाज खान, सुरेश ओबेरॉय, नील नितिन मुकेश, पंकज त्रिपाठी, करण कुंद्रा, वंदना गुप्ते, पद्मिनी कोल्हापुरे, जुही चावला, सुरवीन चावला, शमा सिकंदर, नेहा भसीन, हर्षदा खानविलकर, सुबोध भावे, श्रेयस तळपदे, सुनील बर्वे, संजय नार्वेकर, स्वप्नील जोशी, . अभिजीत केळकर, अरुण नलावडे, जयवंत वाडकर, प्रदीप कबरे, सुहास शिरसाठ, चिराग पाटील, नंदिनी वैद्य, मानसी नाईक, सायली सानवी,.चिराग पाटील, जितू वर्मा, गुरमीत चौधरी, मुनव्वर फारुखी, वरदा खान-नाडियाडवाला, सुनील रॉड्रिग्ज, श्रीमती आर्शिया अर्शी, प्रिया मोहन, सीमा सिंह आदी मान्यवर सहभागी झाले.

चौपाट्या आणि समुद्र किनारे झाले चकाचक-
समुद्र किनारे आणि चौपाट्या म्हणजे मुंबईची शान आहेत. त्या स्वच्छ व सुंदर दिसाव्यात, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने ‘स्वच्छता हीच सेवा’ या उपक्रम अंतर्गत गिरगाव, दादर, माहीम, जुहू, वर्सोवा, मढ-मार्वे-आक्सा, गोराई- मनोरी या प्रमुख चौपाट्यांवर व्यापक स्वच्छता मोहीम राबविली. यामध्ये विविध खासगी आस्थापना, स्वयंसेवी संस्था, विविध संघटना, महाविद्यालयीन विद्यार्थी, गणेश मंडळे, सहकारी गृहनिर्माण संस्था आणि नागरिक स्वयंस्फूर्तीने व उत्‍स्‍फूर्तपणे सहभागी झाले. या अभियानात स्‍वच्‍छतेचे महत्‍व पटवून देण्‍याबरोबरच कचरा वर्गीकरण, कच-याचा पुनर्वापर, एकल वापराच्‍या प्‍लास्‍टिक वापरास पर्याय शोधणे, सार्वजनिक प्रसाधनगृहांची स्‍वच्‍छता याविषयी व्‍यापक संदेश देण्‍यात आला. तसेच, स्‍चच्‍छताविषयक प्रतिज्ञा, प्‍लास्‍टिक बंदी व शून्‍य कचरा याविषयी जनजागृती करण्‍यात आली, अशी माहिती उपआयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) चंदा जाधव यांनी दिली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.