Asian Games : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची सुवर्ण कमाई; तेजिंदरपाल सिंग आणि अविनाश साबळे यांच्या कष्टाचे चीज

174
Asian Games : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची सुवर्ण कमाई; तेजिंदरपाल सिंग आणि अविनाश साबळे यांच्या कष्टाचे चीज
Asian Games : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची सुवर्ण कमाई; तेजिंदरपाल सिंग आणि अविनाश साबळे यांच्या कष्टाचे चीज

चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई खेळ हांगझोऊमध्ये भारताची उत्कृष्ट कामगिरी पाहायला मिळत आहे. (Asian Games) हांगझो येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने आतापर्यंत एकूण 51 पदके जिंकली आहेत, ज्यात 13 सुवर्ण, 20 रौप्य आणि 18 कांस्य पदकांचा समावेश आहे. तेजिंदर पाल सिंग तूरने गोळाफेकमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. भारताने रविवारी आशियाई क्रीडा स्पर्धेत तिसरे सुवर्ण जिंकले. गेल्या आशियाई स्पर्धेतही त्याने भारतासाठी सुवर्णपदक जिंकले होते. या स्थितीत त्याने सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकले आहे. हे भारताचे तेरावे सुवर्ण पदक आहे. तूरने ७.२६ किलो लोखंडी गोळा २०.३६ मीटर दूरपपर्यंत फेकला. त्याने शेवटच्या प्रयत्नात हे यश मिळवले. (Asian Games)

(हेही वाचा – Defence Accounts Department : संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते अकाऊंट्सशी संबंधित डिजिटल उपक्रमांचे अनावरण)

एकूण ६ प्रयत्नांपैकी त्याचे ३ प्रयत्न योग्य होते. प्रत्येक प्रयत्नात तूरची कामगिरी सुधारत गेली. तीन वेळा गोळाफेक करताना त्याने १९.५१ मीटर, २०.०६ मी आणि २०.३६ मीटर अशा कामगिरीची नोंद केली. त्याच्या शेवटच्या प्रयत्नामुळे त्याने सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले. तेजिंदरपाल सिंह तूर याने एक विक्रमही आपल्या नावावर केला आहे. तूर गोळाफेक स्पर्धेत दोनवेळा पदकावर नाव करणारा चौथा भारतीय खेळाडू ठरला आहे. (Asian Games)

स्टीपलचेसमध्ये अविनाश साबळे याने सुवर्ण पदक पटकावले 

एशियन गेम्सच्या 3000 मीटर स्टीपलचेसमध्येही भारताने सुवर्ण पदक पटकावले आहे. एथलेटिक्स स्पर्धांमधले (Asian Games) भारताचं हे पहिले सुवर्ण पदक आहे. बीड जिल्ह्यातील लांब पल्ल्याच्या धावपटू अविनाश साबळे याने हे सुवर्ण पदक पटकावले आहे. अविनाश पहिली ते पाचवीपर्यंत गावातील जिल्हा परिषद शाळेमध्येच शिकला घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळं त्याचे आई-वडील वीटभट्टीवर काम करायचे आणि त्यातही त्यांना तो मदत करायचा. शाळेत जाताना आणि येताना तो धावण्याचा सराव करायचा. त्याच्या याच सर्वामुळे 2005 मध्ये झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत त्यांना पहिला नंबर पटकावला होता. जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर अविनाशला ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवता आला नसला तरी, स्टीपलचेस प्रकारात जागतिक स्पर्धेत अंतिम फेरीत स्थान मिळवणारा तो पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरला होता.

19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या आठव्या दिवशी भारताच्या पदकांमध्ये मोठी भर पडण्याची शक्यता आहे. भारताने आतापर्यंत वेगवेगळ्या खेळामध्ये सेमीफायनलमध्ये स्थान निश्चित करत पदक पक्के केले आहे. यंदा भारताच्या नावावर कमीतकमी 100 पदकांची नोंद होण्याची शक्यता आहे. (Asian Games)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.