P-20 summit : पार्लमेंट-20 साठी दिल्लीत तयारी सुरू , नव्या संसदेची जगाला होणार ओळख

P20 शिखर परिषदेचा मुख्य कार्यक्रम १३ व १४ ऑक्टोबर आहे, परंतु १२ऑक्टोबरपासून परिषद सुरू होईल.

117
P-20 summit : पार्लमेंट-20 साठी दिल्लीत तयारी सुरू , नव्या संसदेची जगाला होणार ओळख
P-20 summit : पार्लमेंट-20 साठी दिल्लीत तयारी सुरू , नव्या संसदेची जगाला होणार ओळख

१२ ते १४ ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या या परिषदेत G20 शिखर परिषदेत सहभागी सर्व देशांच्या संसदेचे अध्यक्ष आणि त्यांच्यासोबत येणारे खासदारांचे शिष्टमंडळ सहभागी होणार आहे. देशाच्या नवीन संसद भवनात हा कार्यक्रम होणार आहे. P-20 परिषदेच्या (P-20 Summit) माध्यमातून संपूर्ण जग भारताच्या लोकशाहीच्या नव्या मंदिरासमोर येणार आहे.एक पृथ्वी, एक कुटुंब आणि एक भविष्य या ध्येयांसह भारत P20 परिषदेत आपला शतकानुशतके जुना लोकशाही इतिहास जगासमोर मांडणार आहे.
P20 शिखर परिषदेचा मुख्य कार्यक्रम १३ व १४ ऑक्टोबर आहे, परंतु १२ऑक्टोबरपासून परिषद सुरू होईल. पहिल्या दिवशी पार्लमेंटरी फोरम ऑन लाईफ या थीमवर अनेक कार्यक्रम होणार आहेत. राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमांना अंतिम रूप दिले जात आहे. परिषदेत एकूण चार सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या सत्रात हे २०३० पर्यंत संयुक्त राष्ट्रांनी शाश्वत विकास लक्ष्यांवर आधारित आहे. यामध्ये कोरोना महामारीनंतर जागतिक स्तरावर गरिबी आणि मागासलेपणाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी बनवलेल्या धोरणांचा आणि त्यांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला जाणार आहे.

(हेही वाचा : Defence Accounts Department : संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते अकाऊंट्सशी संबंधित डिजिटल उपक्रमांचे अनावरण)

या सत्रात भारत आपल्या विविध लोक कल्याणकारी योजना सर्व देशांसमोर रोल मॉडेल म्हणून मांडणार आहे. दुसरे सत्र हे पर्यायी ऊर्जा स्त्रोतांद्वारे हवामान बदलाच्या आव्हानांना सामोरे जाण्याबद्दल आहे. तिसऱ्या सत्रातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे नव्या संसदेच्या सुरुवातीलाच महिला आरक्षण विधेयक मंजूर करून भारताने जगासमोर आदर्श ठेवला आहे. यानंतर चौथे आणि अंतिम सत्र म्हणजे सार्वजनिक डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे लोकांच्या जीवनात परिवर्तन या विषयावर आधारित असणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.