Toll Rates Increased : मुंबईत प्रवेशासाठी मोठी किंमत मोजावी लागणार; वाचा टोलच्या दरात किती रुपयांची वाढ

133
New Toll Rates: लोकसभा निवडणुकीनंतर महामार्गांवर नवीन टोल दर लागू होणार - निवडणूक आयोग
New Toll Rates: लोकसभा निवडणुकीनंतर महामार्गांवर नवीन टोल दर लागू होणार - निवडणूक आयोग

मुंबईतील पाचही टोल नाक्यांवरील टोलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. (Toll Rates Increased) 5 रुपयांपासून ते 30 रुपयांपर्यंतची दरवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईत प्रवेश करणे महागले आहे. चार चाकीच्या टोल दरात 5 रुपयांची, मिनि बसच्या टोलमध्ये 10 रुपयांची, ट्रकच्या टोल दरात 20 रुपयांची, तर अवजड वाहनांच्या टोल दरात 30 रुपयांची वाढ झाली आहे. आजपासूनच ही दरवाढ लागू करण्यात आली आहे. (Toll Rates Increased)

(हेही वाचा – Panvel : रेल्वे प्रवाशांचा सुटकेचा निश्वास; पनवेलच्या एका लेनवरून वाहतूक सुरु)

 एमईपी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने ही टोल दरात वाढ केली आहे. मनसेचा विरोध डावलून टोल दरवाढ करण्यात आली आहे.  टोल दरवाढ झाल्यामुळे मुंबईचे एन्ट्री पॉइंट असलेल्या वाशी, मुलुंड पूर्व, मुलुंड पश्चिम, ऐरोली आणि दहिसर टोल नाक्यावर अधिकचे पैसे भरूनच मुंबईत प्रवेश करावा लागणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने टोल दर वाढण्यास विरोध केला आहे. चार चाकीच्या टोल दरात 5 रुपयांची, मिनि बसच्या टोलमध्ये 10 रुपयांची, ट्रकच्या टोल दरात 20 रुपयांची, तर अवजड वाहनांच्या टोल दरात 30 रुपयांची वाढ झाली आहे. (Toll Rates Increased)

टोलचे नवे दरपत्रक
  • या आधी चारचाकी वाहनांना 40 रुपये टोल आकारला जात होता. पण आजपासून हाच टोल 45 रुपये आकारला जाईल.
  • पाचही टोल नाक्यांवर मिनी बससाठी 65 रुपये टोल आकारला जात होता. पण आता त्यासाठी 75 रुपये इतका आकारण्यात येणार आहेत.
  • ट्रकसाठी सध्या 130 रुपये टोल आकारला जात होता. आजपासून 150 रुपये टोल आकारला जात आहे.
  • अवजड वाहनांसाठी सध्या 160 रुपये टोल आकारला जात होता. आजपासून हेच दर 190 रुपयांवर पोहोचणार आहेत. (Toll Rates Increased)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.