Rahul Gandhi : वीर सावरकरांवरील टीकेप्रकरणी कोर्टाने बजावली नोटीस ; राहुल गांधींच्या अडचणी वाढणार

150
Rahul Gandhi : वीर सावरकरांवरील टीकेप्रकरणी कोर्टाने बजावली नोटीस ; राहुल गांधींच्या अडचणी वाढणार

काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मागे ‘भारत जोडो’ यात्रा केली होती. या यात्रेदरम्यान त्यांनी सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली. मात्र यावेळी त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका केली होती. आता त्यांच्या हे प्रकरण अंगाशी आले आहे. राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. लखनऊ न्यायालयाकडून राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना एक नोटीस पाठवण्यात आली आहे.

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी त्यांच्या भारत जोडो यात्रेदरम्यान त्यांच्या भाषणातून वीर सावरकरांचा अपमान केला होता. त्यानंतर उत्तर प्रदेशच्या लखनऊ पोलीस स्थानकात राहुल गांधींच्या विरोधात तक्रार नोंदवण्यात आली होती. त्यानंतर आता या तक्रारीसंदर्भातील याचिका जिल्हा सत्र न्यायाधीश अश्विनीकुमार त्रिपाठी यांनी स्वीकारली आहे. त्यानंतर त्यांनी आता राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना नोटीस बजावली आहे.

(हेही वाचा – Bharat Vs Canada : कॅनडातील भारतीय वंशाच्या लोकांना सुरक्षित ठेवण्यास भारत सक्षम!)

नोव्हेंबर १७, २०२२ रोजी अकोल्यातील भारत जोडी यात्रेदरम्यान राहुल गांधी (Rahul Gandhi) भाषण करत होते. मात्र त्यानंतर त्यांनी वीर सावरकर यांच्यावर टीका केली.

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यासह आणखी काही जणांना ही नोटीस पाठवण्यात आली आहे. ही याचिका विशेष सत्र न्यायालयात सुपूर्द करण्यात आली आहे. येत्या १ नोव्हेंबर रोजी याप्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.