PM Narendra Modi : मोदी यांच्या हस्ते तेलंगणात 13 हजार कोटींच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी

148
PM Narendra Modi : मोदी यांच्या हस्ते तेलंगणात 13 हजार कोटींच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी रविवार, १ ऑक्टोबर रोजी तेलंगणातील महबूबनगर जिल्ह्यात १३ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी संवाद साधला.

याप्रसंगी पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) म्हणाले की, “२०१४ मध्ये एलपीजी कनेक्शनची संख्या सुमारे १४ कोटी होती, जी आता ३२ कोटींहून अधिक झाली आहे. अलीकडेच आम्ही गॅस सिलिंडरच्या किमतीही कमी केल्या आहेत. रस्ते, रेल्वे, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू आणि उच्च शिक्षण यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रातील १३ हजार ५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांचे पंतप्रधान मोदींनी उद्घाटन आणि पायाभरणी केली. तसेच, यावेळी नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे रेल्वे सेवेला हिरवा झेंडा दाखवला.

(हेही वाचा – BJP : भाजपा नेत्यांनो अलर्ट व्हा!)

देशातील अनेक मोठे आर्थिक कॉरिडॉर तेलंगणातून जात आहेत. सर्व राज्यांना पूर्व आणि पश्चिम किनाऱ्याशी जोडण्याचे हे माध्यम बनतील. तसेच, आज मी तेलंगणाच्या भूमीवरून घोषणा करत आहे की, केंद्र सरकारने हळद उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि त्यांच्या गरजा लक्षात घेऊन राष्ट्रीय हळद मंडळाची स्थापना केल्याचे मोदींनी (PM Narendra Modi) सांगितले.

पुढे बोलतांना मोदी (PM Narendra Modi) म्हणाले की; “सणासुदीचा हंगाम सुरू झाला आहे. नवरात्र सुरू होणार आहे, पण संसदेत महिला आरक्षण विधेयक मंजूर करून आपण त्याआधीच ‘शक्ती’ची पूजा करण्याची भावना प्रस्थापित केली आहे. तसेच, १३ हजार ५०० कोटी रुपयांच्या प्रकल्पांसाठी मी तेलंगणाचे अभिनंदन करतो. आज असे अनेक रस्ते जोडणी प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत, जे लोकांच्या जीवनात मोठे बदल घडवून आणतील, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. नागपूर-विजयवाडा कॉरिडॉरच्या माध्यमातून तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रात प्रवास करणे सोयीचे होणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. तसेच. या कॉरिडॉरमुळे या तिन्ही राज्यांतील व्यापार, पर्यटन आणि उद्योगाला (PM Narendra Modi) चालना मिळेल.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.