Monsoon Update : देशात परतीच्या पावसाचा धुमाकूळ; ‘या’ भागात जोरदार पावसाचा अंदाज

201
Monsoon Update : देशात परतीच्या पावसाचा धुमाकूळ; 'या' भागात जोरदार पावसाचा अंदाज

मागील तीन चार दिवसांपासून पुन्हा पावसाने (Monsoon Update) आपली हजेरी लावली आहे. अशातच आजही म्हणजेच सोमवार २ ऑक्टोबर रोजी ठाणे मुंबईसह उपनगरात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या सुरुवातीच्या दिवसांत दडी मारून बसलेला पाऊस (Monsoon Update) राज्यात पुन्हा एकदा सक्रिय झालेला पाहायला मिळत आहे.

अशातच आता हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोकणाला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. IMD म्हणजेच भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, आणि गोव्यात मुसळधार पाऊस (Monsoon Update) होण्याची शक्यता आहे.

राज्यासह देशातील अनेक शहरांमध्ये हवामान विभागाकडून आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

‘या’ राज्यांना ऑरेंज अलर्ट

हवामान विभागाने उत्तर ओडिसा, बिहार, झारखंड, सिक्कीम, उप-हिमालयीन पश्चिम बंगालमध्ये हलका ते मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. हवामान विभागाने (IMD) ओडिसा, झारखंड राज्यांसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. छत्तीसगड आज आणि उद्या पूर्व मध्य प्रदेशात आणि छत्तीसगडमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तर, काही भागांत विजांच्या गडगडाट आणि वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज आहे. उत्तर छत्तीसगडमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे.

(हेही वाचा – Lalbaugcha Raja : लालबागच्या राजाचरणी भाविकांकडून भरभरुन दान; दानपेटीत साडे तीन किलो सोने, तर…)

मान्सूनचा परतीचा प्रवास…

हवामान विभागाने (Monsoon Update) दिलेल्या माहितीनुसार, आज म्हणजेच मंगळवार २६ सप्टेंबर पासून मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला (Monsoon Update) सुरुवात होणार असून, उत्तर भारतापासून याची सुरुवात होणार आहे. तसेच राजस्थानच्या काही भागांतून नैऋत्य मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरु होणार आहे. महाराष्ट्रात मान्सूनचं आगमनच उशिरा झाल्यामुळे त्याच्या परतीचा प्रवासही (Monsoon Update) उशिराने म्हणजेच १० ऑक्टोबरनंतर सुरु होणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.

थोडक्यात एकीकडे राज्यात सध्या मान्सूनचाच पाऊस (Monsoon Update) सुरु असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. तर दुसरीकडे देशाच्या उत्तरेकडे आतापासूनच हवामान बदलण्यास सुरुवात झाली असून, थंडीची हलकी चाहूल लागण्यास सुरुवात झाली आहे.

हेही पहा –  

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.