Tembhu Yojana : उपोषण सुरू करण्याआधीच टेंभू योजनेला मान्यता…

टेंभू विस्तारीत योजनेसाठी आठ टी. एम. सी. पाणी उपलब्ध करुन देण्यास राज्य शासनाने दिली मंजूरी

159
Tembhu Yojana : उपोषण सुरू करण्याआधीच टेंभू योजनेला मान्यता...
Tembhu Yojana : उपोषण सुरू करण्याआधीच टेंभू योजनेला मान्यता...
सांगलीच्या विस्तारीत टेंभू योजनेच्या (Tembhu Yojana) आठ टीएमसी पाण्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मंजुरी आमदार सुमनताई पाटील उपोषण सुरू करण्याआधी योजना मंजुरी खानापूर आटपाडी आणि तासगाव तालुक्यातील गावांना मोठा दिलासा. आजपासून आमदार सुमनताई पाटील उपोषणाला बसणार होत्या. श्रेय घेण्याआधीच मुख्यमंत्र्यांनी आमदार अनिल बाबर यांच्या हातात सुधारित शासन निर्णय दिला.
टेंभू योजनेच्या तिसऱ्या सुप्रमास लवकरच मान्यता
बोंडारवाडी प्रकल्पासह सातारा जिल्ह्यातील कृष्णा प्रकल्पाच्या फेरजलनियोजनास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. त्यासंदर्भात ३० सप्टेंबर रोजी सुधारित शासन निर्णय देखील जाहिर करण्यात आला आहे. आमदार अनिल बाबर यांनी याविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला होता.

(हेही वाचा-Sudhir Mungantiwar : छत्रपती शिवरायांच्या वाघनखांसाठी लंडनला जातोय हा अभिमानाचा क्षण)

दरम्यान, आज वर्षा निवासस्थानी आमदार बाबर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यावेळी शासन निर्णयाची प्रत मुख्यमंत्री शिंदे यांनी आमदार बाबर यांना दिली. दरम्यान, टेंभू योजनेच्या (Tembhu Yojana) तिसऱ्या सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्यात येईल, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी आमदार बाबर यांना सांगितले.
दुष्काळी खानापूर आटपाडी व विसापूर सर्कल तासगाव तालुक्यातील ३४ गावातील शेतकऱ्यांना टेंभू योजनेचे (Tembhu Yojana) हक्काचे पाणी मिळावे, यासाठी आमदार बाबर पाठपुरावा करीत करीत आहेत. टेंभू विस्तारीत योजनेसाठी आठ टी. एम. सी. पाणी उपलब्ध करुन देण्यास राज्य शासनाने मंजूरी दिली आहे.

हेही पहा-https://www.youtube.com/watch?v=boTP3Dnfy1M&t=1s

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.