राजस्थान मधील काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारवर जोरदार हल्ला चढवत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सोमवारी ( २ ऑक्टोबर) या सरकारला ‘कुर्सी बचाओ सरकार’ असे संबोधले. पंतप्रधान मोदी यांनी राजस्थानच्या चित्तोडगड येथे सभेला संबोधित करताना काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला.राजस्थानमधील महिलांवरील अत्याचार पाहून वेदना होतात. पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल गेल्या पाच वर्षात काँग्रेसने राज्याला संपवले असेही परखड मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
पंतप्रधान मोदी यांनी राज्यात विविध विकास कामांचा शुभारंभ केला. त्यांनी सकाळी चित्तोडगडमध्ये जवळपास ७००० कोटी रुपयांच्या कामांचे उद्घाटन केले. भाजप राजस्थानमध्ये महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देईल, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. मोदींनी यावेळी इंडिया आघाडीवर टीका केली. त्यांना महिलांना न्याय द्यायचा नाही. केवळ ते दिखावा करत आहेत, असं ते म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले की गुन्हेगारीमध्ये राज्य प्रथम असल्याच्या मला वेदना होतात. पंतप्रधान मोदींनी काँग्रेस पक्षावर पाच वर्षांच्या राजवटीत गैरव्यवस्थापनाचा आरोप केला आणि त्यांनी राजस्थानला अशाच स्थितीत सोडले आहे. देशातील पाच राज्यात विधानसभेच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. यापार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी प्रचारसभांचा धडाका लावला आहे. (PM Narendra Modi)
(हेही वाचा : Konkan Cyclone : कोकण किनारपट्टीवर चक्रीवादळासह मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा अंदाज)
दंगल होण्यामध्ये राज्य पहिला आहे. दगडफेकीच्या घटनांमध्ये राज्य पहिला आहे. महिलांवरील आणि दलितांवरील अॅट्रोसिटीसाठी राज्याचे नाव कुख्यात आहे. यासाठीच तुम्ही काँग्रेसला निवडून दिला होता का? असा सवाल मोदींनी जनतेला विचारला राज्यातील अवस्थेबाबत बोलताना मोदी भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.पंतप्रधान मोदी काँग्रेसवर टीका करताना म्हणाले की, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पराभव स्विकारला आहे. सत्तेत आल्यास विकासाला प्राधान्य दिले जाईल. तसेत काँग्रेसच्या भ्रष्ट कारभाराविरोधात कारवाई केली जाईल.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community