गणेश विसर्जन मिरवणूक उत्साहात पार पडली. भक्त-भाविकांनी डीजे, लेझर लाईट (Laser light) आणि पारंपरिक वाद्यांच्या तालावर बेधुंद नाचून गणरायाला निरोप दिला, पण मिरवणुकीनंतर बऱ्याच ठिकाणी अनेक जणांना आरोग्याच्या तक्रारी उद्भवल्या आहेत. नाशिकमधील (Nashik) मिरवणुकीनंतर असाच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
गणपती विसर्जनानंतर एका तरुणाची दृष्टी कमी झाल्याचे त्याच्या लक्षात आले. नेत्रतज्ज्ञांकडे तो तपासणीसाठी गेला असता त्याच्या नेत्रपटलावर रक्त साचून भाजल्यासारख्या जखमा आढळल्या. वैद्यकीय तपासणीत मिरवणुकीत लेझर शो (Laser show) जास्त बघितल्यामुळे डोळ्यांना अशा प्रकारचा त्रास झाल्याचे निदर्शनास आले. जे तरुण या लेझरच्या फ्रिक्वेन्सीच्या फोकल लेंग्थवर आले त्यांच्या नेत्रपटलावर हा परिणाम झाल्याचे निदर्शनास आले. या विसर्जन मिरवणुकीनंतर नेत्रतज्ज्ञांकडे डोळे तपासायला येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे.
(हेही वाचा – PM Narendra Modi : राजस्थानमधील महिलांवरील अत्याचार पाहून वेदना होतात; पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल )
या संदर्भात जास्त माहिती देण्यासाठी नाशिकच्या नेत्र रोग संघटनेने (Eye Disease Association) पत्रकार परिषद आयोजित केली आहे. नाशिक येथील आयएमए सभागृहात ही परिषद होणार आहे. नेत्र रोग तज्ज्ञ यासंदर्भात माहिती देणार आहेत.
Join Our WhatsApp Community