Womens Scheme : नवरात्रीमध्ये मिळणार महिलांना मोठी भेट

187
Womens Scheme : नवरात्रीमध्ये मिळणार महिलांना मोठी भेट
Womens Scheme : नवरात्रीमध्ये मिळणार महिलांना मोठी भेट

असं म्हटलं जात की, महिलांना हक्काचे घर मिळविण्यासाठी पतीवर किंवा वडीलांवर अवलंबुन रहावे लागते, यामुळे तीला आयुष्यभर हे घर तुझे नाही, हे कधी ना कधी ऐकावेच लागते. हेच समस्त महिलांवर्गांचे दु:ख मोदी सरकारने अचुक ओळखले आहे. यामुळे खास महिलांना स्वत: चे हक्काचे घर घेता यावेयासाठी खास योजना फक्त महिलावर्गांसाठी नवरात्रीमध्ये केंद्र सरकार राबविणार असल्याची माहिती सुत्रांकडुन प्राप्त झाली आहे. या योजनेमुळे महिलांना स्वत: चे हक्काचे घर घ्यायला नक्कीच मदत मिळणार आहे. (Womens Scheme)

महिलांची स्थावर मालमत्ता वाढावी, यासाठी खास घर घेण्यासाठी अतिशय अल्प व्याजदरावर गृहकर्ज योजनेची आखणी करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे. तसेच महिलांनी स्वत: च्या नावावर घर घ्यावे, यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी खास व्याज दरावर सवलत देण्यात येणारी आहे. महिला आरक्षण कायदा आणल्यानंतर केंद्र सरकार पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी महिलांसाठी मोठी घोषणा करण्याच्या तयारीत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महिलांच्या नावावर घेतलेल्या सर्व प्रकारच्या कर्जावरील व्याजदर पुरुषांच्या तुलनेत कमी करण्यात येणार आहेत. नवरात्रीच्या काळात यासंबंधीच्या योजना जाहीर केल्या जाऊ शकतात. (Womens Scheme)

गृहकर्ज घेण्याच्या बाबतीत महिलांचे प्रमाण पुरुषांपेक्षा जास्त आहे. ४६ टक्के पुरुषांच्या तुलनेत ४८ टक्के महिलांनी गृहकर्ज घेतले आहे. उर्वरित ६ टक्के कर्ज संयुक्तपणे घेतले आहे. व्यवसाय, शेती आणि मुलांच्या उच्च शिक्षणासाठी महिलांमध्ये कर्ज घेण्याचा कलही झपाट्याने वाढला आहे. ३३ टक्के महिला आरक्षण विधेयकाची तातडीने अंमलबजावणी न करण्याबाबत प्रश्न उपस्थित करणाऱ्या पक्षांना उत्तर देण्यासाठी ही योजना पुरेशी असल्याचे सरकारला वाटते. (Womens Scheme)

(हेही वाचा – Nashik : मिरवणुकीत गेले आणि डोळे भाजून आले, नाशिक मध्ये नेमके काय घडले)

संसदेच्या विशेष अधिवेशनात महिला आरक्षण विधेयक मंजूर झाल्यानंतर आणि त्याचा कायदा झाल्यानंतर देशातील प्रत्येक क्षेत्रात महिलांच्या सहभागावर बरीच चर्चा झाली आहे. केंद्र सरकारने महिलांना स्वस्तात कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी सविस्तर अहवाल तयार केला आहे. कर्जावर किती सूट मिळेल या प्रश्नावर अर्थ मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, याबाबत अद्याप खुलासा करता येणार नाही. परंतु ३०.४० लाखांपर्यंत गृहकर्ज घेणाऱ्या महिलांना व्याजात सवलत मिळण्याची शक्यता आहे. जर एखादी महिला गृहकर्जासाठी सहअर्जदार असेल तरीही ही सूट मिळू शकते. बँकांव्यतिरिक्त इतर संस्था देखील स्वस्त कर्ज योजना आणतील असा विश्वास आहे. (Womens Scheme)

महिलांना कर्जाच्या व्याजात सूट देण्यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे तयार केली जातील. सामान्य महिलांना ही सूट नक्कीच मिळेल, परंतु एकल मूल फक्त मुलगी किंवा विधवा या महिलांना अधिक सूट मिळू शकते. त्याचबरोबर नोकरदार महिलांना परवडणाऱ्या दरात कर्ज उपलब्ध करून देण्याचा विचार सुरू आहे. १ ते ५ वर्षांच्या कालावधीत नोकरी करणाऱ्या मुलींना सवलतीचा लाभ मिळावा, जेणेकरून त्यांना मालमत्ता निर्माण करण्यास प्रवृत्त करता येईल, हा यामागचा उद्देश आहे. ज्याप्रमाणे राज्यांमध्ये जमीन किंवा घराच्या नोंदणीसाठी कमी शुल्कामुळे महिलांच्या नावावर अधिक मालमत्तांची नोंदणी होत आहे त्याचप्रमाणे महिलांच्या नावावर कर्ज वाढल्याने त्यांची स्थावर मालमत्ताही वाढण्यास सुरुवात होईल, असे भाजपच्या रणनीतीकारांना वाटते. (Womens Scheme)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.