Udhayanidhi Stalin : यंदाच्या दसऱ्याला लाल किल्ल्यावर होणार स्टॅलिनच्या पुतळ्याचे दहन

166
Udhayanidhi Stalin : यंदाच्या दसऱ्याला लाल किल्ल्यावर होणार स्टॅलिनच्या पुतळ्याचे दहन
Udhayanidhi Stalin : यंदाच्या दसऱ्याला लाल किल्ल्यावर होणार स्टॅलिनच्या पुतळ्याचे दहन

सनातन धर्माविरूध्द सातत्याने गरळ ओकणारे तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन आणि कर्नाटकचे मंत्री प्रियांक खर्गे यांचा एकमुखाने विरोध करण्याचा निर्णय देशभरातील संतसमाजाने घेतला आहे. यंदाच्या विजयादशमीला रावण, कुंभकर्ण आणि मेघनादसह उदयनिधी स्टॅलिन यांच्याही पुतळ्याचे दहन करण्याचा निर्णय लवकुश रामलीला समितीने घेतला आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे चिरंजीव मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांच्या सनातन धर्माविरूध्दच्या विधानांमुळे देशभरातील संतसमाज दुखावला गेला आहे. हिंदुंच्या भावना दुखावतील अशाप्रकारचे विधान स्टॅलिन सनातन धर्माबाबत सातत्याने करीत आहे. यामुळे, देशभरातील संतसमाज स्टॅलिन यांच्या विरोधात एकजूट झाला आहे. (Udhayanidhi Stalin)

यंदाच्या विजयादशमीला राक्षसांसह स्टॅलिन यांचाही पुतळा जाळण्याचा निर्णय संतांनी घेतला आहे. दिल्लीच्या लाल किल्ला मैदानावर होणाऱ्या दसरा मेळव्यात हा पुतळा जाळला जाणार आहे. लवकुश रामलीला समितीने लाल किल्ला येथील मैदानावर स्टॅलिन यांचा सहा फुटाचा पुतळा बसविला आहे. रावण, कुंभकर्ण आणि मेघनाद यांचे पुतळे ९० फुटाचे आहेत. रामलीला महासंघाच्या बॅनरखाली काल दिल्लीत सर्व रामलीला समित्यांची बैठक बोलाविण्यात आली होती. प्रत्येक समितीने रावणासह स्टॅलिनच्या पुतळ्याचेही दहन करावे, असे ठरविण्यात आले. २४ ऑक्टोबर रोजी दसरा आहे. या दिवशी रावणासह स्टॅलिन यांचा पुतळासुध्दा दहन केला जाणार आहे. स्टॅलिन म्हणजे आजचे रावण असे मत हिंदु संघटना आणि संतांनी व्यक्त केली आहे. (Udhayanidhi Stalin)

रामलीला महासंघाचे अध्यक्ष अर्जुन कुमार म्हणाले की, संविधानाची शपथ घेणाऱ्या या नेत्यांकडून सनातन धर्मावर सातत्याने हल्ले होत आहेत. या नेत्यांकडून लोकशाहीविरोधी काम होणे अत्यंत खेदाची बाब आहे. ते समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत. धर्माच्या आधारे बहुसंख्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही बाब खपवून घेतली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. सनातन धर्माला संपविण्याचे प्रयत्न अनादीकाळापासून होत आहे. परंतु, सनातन धर्माच्या अस्तित्वाला धक्का सुध्दा लागला नाही आणि लागणार नाही. कारण, सनातन धर्म हा शाश्वत आहे आणि तो ईश्वरानेच निर्माण केला आहे, असे मत धार्मिक लीला समितीचे अध्यक्ष धीरजधर गुप्ता यांनी व्यक्त केले. (Udhayanidhi Stalin)

(हेही वाचा – Mumbai Drugs : समुद्र किनाऱ्यावर वाहून आलेल्या ‘चरस’ची मुंबईत विक्री, दोघांना अटक)

दिल्लीतील सर्व रामलीलांसाठी वीज मोफत देण्यात यावी आणि सनातन धर्माच्या विरोधात बोलणाऱ्या समाजकंटकांवर ठोस कारवाई करण्यात यावी, अशी मागणी दिल्ली सरकारसह विविध राज्यांतील सरकारला करण्याचा निर्णय सुध्दा बैठकीत घेण्यात आला. दिल्लीत फटाके फोडण्यावर बंदी आहे. मात्र, दसऱ्याच्या दिवशी जाळल्या जाणाऱ्या पुतळ्यांमध्ये इको फ्रेंडली फटाके भरण्याची परवानगी देण्याची मागणी या संघटनांनी केली आहे. मात्र, सरकारने परवानगी नाकारली तरी आपण इको फ्रेंडली फटाक्यांचा वापर करूच. मग त्यासाठी तुरूंगात जावे लागले तरी हरकत नाही, असे मत काश्मीरी गेट रामलीला समितीचे अध्यक्ष आणि माजी महापौर अवतान सिंग यांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, दिल्लीचे भाजपाध्यक्ष विरेंद्र सचदेवा आणि प्रवक्ता प्रवीण शंकर कपूर यांनी संत समाजाने घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. (Udhayanidhi Stalin)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.