Sushant Singh Rajput and Disha Salian suicide case : आदित्य ठाकरे यांच्या विरोधात जनहित याचिका दाखल

केंद्रीय तपासयंत्रणेतील सीबीआय अधिकाऱ्यांवरही ढिलाईनं काम केल्याबद्दल कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

149
Aaditya Thackeray यांच्यामुळे दोन आमदारांची आमदारकी धोक्यात?

सुशांतसिंह राजपूत (Sushant Singh Rajput) आणि दिशा सालियन ( Disha Salian) आत्महत्या प्रकरणी (suicide case) आदित्य ठाकरे (Aditya Thackeray)यांच्या विरोधात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी त्यांची चौकशी सुरु आहे. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात सोमवारी (२ ऑक्टोबर) याचिका सादर करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टातील अशिलांच्या संघटनेचे अध्यक्ष राशिद खान पठाण यांनी ही जनहित याचिका दाखल केली असून यावर नुकतीच प्राथमिक सुनावणी हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरीफ डॉक्टर यांच्या खंडपीठापुढे झाली.

दिशा सालियन आणि सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी आदित्य ठाकरेंना ताब्यात घेऊन चौकशीची का गरज आहे? हे पटवून देताना अनेक आरोप या याचिकेतून करण्यात आलेत. ८ जून २०२० रोजीच दिशा, आदित्य ठाकरे, राहुल कनाल, सूरज पांचोली, सचिन वाझे, एकता कपूर यांच मोबाईल लोकेशन तपासलं जावं, कारण त्या रात्री हे सगळे १०० मीटरच्या परिसरात एकत्रच होते. तसेच १३ व १४ जून २०२०रोजीचं सुशांतसिंह राजपूत, रिया चक्रवर्ती, आदित्य ठाकरे, अरबाज खान, संदिप सिंह, शौविक चक्रवर्ती या सर्वांचेही मोबाईल लोकेशन तपासले जावेत. तसेच या दोन्ही दिवसांचं आसपासच्या परिसरातील आदित्य ठाकरेंशी संबंधित सारं सीसीटिव्ही फुटेज तपासलं जावं.

(हेही वाचा : Pedhambe Education Society : पेढांबे येथील शिक्षण प्रसारक संघाने घडवल्या विद्याविभूषितांच्या पिढ्या – भास्कर जाधव)

या याचिकेतून केंद्रीय तपासयंत्रणेतील सीबीआय अधिकाऱ्यांवरही ढिलाईनं काम केल्याबद्दल कारवाईची मागणी करण्यात आली आहे. तसेच राज्याच्या महाधिवक्त्यांना सीबीआयविरोधात सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशांचा अवमान केल्याबद्दल याचिका दाखल करण्याचे आदेश देण्याची मागणीही याचिकेतून करण्यात आली आहे. सुशांतचा मृत्यू झाला त्यादरम्यान आदित्य ठाकरे आणि रिया चक्रवर्ती यांच्यात ४४ वेळा फोनवर काय बोलणं झालं? याची चौकशी व्हायला हवी. सुशांत आणि दिशाच्या मृत्यूवर सवाल उठवणाऱ्या सर्व साक्षी पुराव्यांची सखोल चौकशी व्हावी.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.