वर्धा ते नांदेड रेल्वेमार्गाचा (Wardha-Nanded Railway) १० तासांचा प्रवास आता अवघ्या ४ तासांवर येणार आहे. वर्धा ते यवतमाळ (Wardha to Yavatmal) हा ७८ किलोमीटरचा पहिला टप्पा आणि यवतमाळ ते नांदेड (Yavatmal to Nanded) हा २०६ किलोमीटरचा दुसरा टप्पा असून एकूण २८४ किलोमीटरचा रेल्वेमार्ग साडेतीन हजार कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे.
वर्धा ते यवतमाळ मार्गाच्या पहिल्या टप्प्याचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. यवतमाळ ते नांदेड मार्गावर १५ मोठे पूल, २९ बोगदे आणि ५ उड्डाणपुलांचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. वर्धा ते कळंब ४० किलोमीटर अंतराच्या रेल्वेमार्गाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. त्यामुळे येत्या जानेवारीपर्यंत वर्धा देवळी ते कळंब मार्गावर रेल्वेगाडी धावण्याची शक्यता आहे.
(हेही वाचा – Deepak Kesarkar : आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्यावर दीपक केसरकर यांचे टीकास्त्र, आताची लहान मुलं काहीही बोलतात !)
सामाजिक-आर्थिक योगदानास मदत
नोव्हेंबर किंवा डिसेंबर २०२३ मध्ये वर्धा ते कळंबदरम्यान रेल्वे प्रवासाची चाचणी होण्याची शक्यता आहे. वर्ध्याहून नांदेडला जाण्यासाठी उपलब्ध रेल्वेसेवेने साडेदहा तास लागतात. हा मार्ग पूर्ण झाल्यावर केवळ ४ तासांत हे अंतर पार करणे शक्य होणार आहे. यामुळे विदर्भ आणि मराठवाड्याला जोडण्यासाठी चांगला पर्याय उपलब्ध होणार आहे, त्यामुळे कमी पैशात नागरिकांना दूरचा प्रवास शक्य होईल. यामुळे वर्धा, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड या ५ जिल्ह्यांमध्ये रेल्वे संपर्क सुधारेल आणि या प्रदेशांच्या सामाजिक आणि आर्थिक योगदान मिळण्यास मदत होणार आहे.
हेही पहा –