पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना दरवर्षी हजारो वस्तू भेट म्हणून मिळतात. या वस्तू मौल्यवान असतात. त्या वस्तूंचा दर वर्षी लिलाव करण्यात येतो. या लिलावातून मिळणारी रक्कम एखाद्या विशेष कार्यासाठी वापरली जाते. यंदाही पंतप्रधानांच्या वाढदिवशी या भेटवस्तूंचा लिलाव केला जाणार आहे. (PM Narendra Modi)
पंतप्रधान मोदींना देश-विदेशातील विविध व्यक्ती आणि संस्थांकडून भेटवस्तू मिळत असतात. पंतप्रधान या भेटवस्तूंचा लिलाव करतात आणि त्यातून मिळालेली रक्कम समाजकारणासाठी दान करतात.
१७ सप्टेंबर रोजी पंतप्रधानांनी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी चौथ्यांदा त्यांच्या भेटवस्तूंचा लिलाव सुरू केला होता.
यामध्ये १०० रुपयांपासून १० लाख रुपयांपर्यंतच्या भेटवस्तूंचा समावेश आहे. २ ऑक्टोबर पर्यंत याची मुदत मात्र आता ३१ ऑक्टोबरपर्यंत करण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community