स्वच्छतेच्या मुद्दयावरून महापालिकेला धारेवर धरत एकप्रकारे महापालिकेची बदनामी करणाऱ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अखेर महापालिकेतील सफाई कामगारांची मने जिंकण्यासाठी अखेर सोमवारी (०२ ऑक्टोबर) दादर शिवाजीपार्क येथील कासारवाडी आणि दादर पूर्व येथील गौतम नगर येथील सफाई कामगारांच्या वसाहतींची पाहणी केली. गांधी जयंतीदिनाचे औचित्य साधत सफाई कामगारांच्या वसाहतींची पाहणी करतानाच या कामगारांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची विचारपूस करत एकप्रकारे आपणच केलेल्या बदनामीच्या प्रकारावर पांघरुण घालण्याचे काम मुख्यमंत्र्यांनी केल्याचे बोलले जात आहे. (CM Eknath Shinde)
स्वच्छतेसाठी “एक तारीख एक तास” या राज्यस्तरीय मोहिमेच्या दुसऱ्या दिवशी आणि गांधी जयंतीदिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहरातील विविध प्रभागात भेट देऊन स्वच्छता अभियानाची पाहणी केली. यात प्रामुख्याने मुख्यमंत्र्यांनी महापालिका सफाई कामगार वसाहतीची पाहणी केली. त्यात त्यांनी दादर शिवाजी पार्क येथील कोहिनुर मॉलच्या परिसरातील कासार वाडी, तसेच दाद पूर्व फाळके मार्गावरील गौत नगर येथे भेट देऊन स्वच्छता अभियानाचा आढावा घेतला. यावेळी आमदार सदा सरवणकर, मुंबई महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल आदी उपस्थित होते. पाहणी दौऱ्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. (CM Eknath Shinde)
याप्रसंगी माध्यमांशी बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले की, या वसाहतीतील गैरसोयींची पाहणी केली. येथे आवश्यक असणाऱ्या सुविधांबाबत मुंबई महापालिकेने स्वतंत्र टिमद्वारे आढावा घ्यावा असे निर्देश दिले आहेत. या परिसरातील दोन इमारतींचे काम रखडले आहे. ते पुर्ण व्हावे याकरिता तत्काळ कार्यवाही करण्यात यावी. दोन पाळयांमध्ये काम सुरू करावे. या परिसरातील मुख्य रस्ता, अंतर्गत रस्त्यांची कामे पूर्ण व्हावीत. असे सांगितले. विशेष गौतम नगरमध्ये २२ मजली दोन इमारतीचे बांधकाम प्रस्तावित असून अद्यापही या बांधकामासाठी रिकाम्या झाल्या नसून बांधकामालाही सुरुवात झाली नाही. त्यामुळे प्रत्यक्षात दोन ते तीन वर्षांपेक्षा अधिक काळ उलटूनही या गौतम नगरमधील कामाला सुरुवात न झाल्याने सफाई कामगारांमध्ये नाराजी पसरलेली आहे. (CM Eknath Shinde)
(हेही वाचा – Maharashtra BJP : महाराष्ट्र भाजपात प्रदेशाध्यक्ष बदलाच्या हालचाली?)
याशिवाय दादर कासारवाडीमध्ये सफाई कामगारांच्या वसाहतींचा पहिला पुनर्विकास प्रकल्प राबवला जाणार होता. परंतु आश्रय योजनेतंर्गत सर्व सफाई कामगारांच्या वसाहतींच्या पुनर्विकासाचा प्रकल्पांसाठी कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली असली तरी कासारवाडीतील प्रकल्पासाठी नेमलेला कंत्राटदार रद्द करण्यात आला आहे. मात्र, कंत्राटदार रद्द केल्यानंतर त्याठिकाणी नव्याने निविदा मागवून नवीन कंत्राटदाराची नेमणूक करण्याचीही कार्यवाही स्थगित ठेवली आहे. या वसाहतीतील इमारतींमध्ये मागील अनेक वर्षांपासून सेवा सुविधांचा अभाव असून कामगारांची कुटुंबे आजही गळक्या भिंती आणि छतामुळे प्लास्टिक लावत जगत आहेत. परंतु प्रत्यक्षात या वसाहतींचा विकास होणार नसल्याने तुर्तास तात्पुरती डागडुजी करण्याकडेही प्रशासनाचे लक्ष नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर तरी गौतम नगरच्या रखडलेल्या कामाला सुरुवात होईल आणि कासारवाडीच्या इमारती व चाळींमध्ये दुरुस्तीकामे हाती घेतली जातील का असाच प्रश्न खुद्द कामगारांच्या कुटुंबांकडून व्यक्त केला जात आहे. (CM Eknath Shinde)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community