Malojiraje Bhosale : वीरश्री मालोजीराजे भोसले गढीचा बुरुज ढासळला, शिवभक्तांकडून दुरुस्तीची मागणी

इंदापूर हे गाव मालोजीराजे यांना वतन दिले होते

229
Malojiraje Bhosale : वीरश्री मालोजीराजे भोसले गढीचा बुरुज कोसळला, शिवभक्तांकडून दुरुस्तीची मागणी
Malojiraje Bhosale : वीरश्री मालोजीराजे भोसले गढीचा बुरुज कोसळला, शिवभक्तांकडून दुरुस्तीची मागणी

छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा वीरश्री मालोजीराजे भोसले (Malojiraje Bhosale) यांची पुण्यातील इंदापूर
(pune-indapur) येथे ऐतिहासिक गढी आहे. या गढीवर (fort) त्यांचे वास्तव्य होते. या गढीचा बुरुज रविवारी, (१ ऑक्टोबर) ला कोसळला. या गढीचे संवर्धन आणि स्मारकाची दुरुस्ती करण्याची मागणी शिवभक्तांनी केली आहे.

रविवारी मुसळधार पावसामुळे रात्री या गढीच्या प्रवेशद्वारावरील डाव्या बाजूचा बुरुज कोसळला. यामुळे आगामी काळात या जागेच अजून नुकसान होऊ शकते. त्यामुळे या गढीचे लवकरात लवकर संवर्धन करावे, अशी मागणी नागरी संघर्ष समितीचे प्रमुख आणि माजी उपनगराध्यक्ष प्रा. कृष्णा ताटे, गटनेते कैलास कदम, माजी नगरसेवक श्रीधर बाब्रस, महादेव सोमवंशी, प्रदीप पवार, अशोक ननवरे यांच्यासह इतर शिवभक्तांनी केली आहे.

(हेही वाचा – Maharashtra BJP : महाराष्ट्र भाजपात प्रदेशाध्यक्ष बदलाच्या हालचाली?)

निजामशाहीच्या काळात अनेक गावे वतन देण्यात आली होती. या वतन गावांमध्ये इंदापूर हे गाव मालोजीराजे यांना वतन दिले होते. त्यांची समाधी या पुरातन गढीसमोरील जागेत आहे, याची नोंद शिवभारत ग्रंथात (Shivbharata Granth) आढळते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.