ISIS Terrorists : दिल्लीत ISIS च्या दहशतवाद्यांना अटक; राममंदिर आणि मोठे नेते होते टारगेट

202
ISIS Terrorists : दिल्लीत ISIS च्या दहशतवाद्यांना अटक; सीरिया, इराक आणि अफगाणिस्तान कनेक्शन
ISIS Terrorists : दिल्लीत ISIS च्या दहशतवाद्यांना अटक; सीरिया, इराक आणि अफगाणिस्तान कनेक्शन

दिल्लीत ISIS च्या दहशतवाद्यांचा शोध घेणाऱ्या दिल्ली पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. (ISIS Terrorists) दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने ISIS च्या ३ संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे. शाहनवाज उर्फ शफी उज्जामा, मोहम्मद रिझवान आणि मोहम्मद अर्शद वारसी अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. दिल्ली पोलिस स्पेशल सेलचे वरिष्ठ अधिकारी एचजीएस धालीवाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “आतंकवाद्यांचे उद्दिष्ट सुप्रसिद्ध लोकांना लक्ष्य करणे आणि जास्तीत जास्त घातपात घडवून आणणे हे होते. या  आतंकवाद्यांच्या अटकेमुळे आयएसआयएस – दहशतवादी गटाच्या संपूर्ण भारतातील नेटवर्कचा पर्दाफाश झाला आहे. या दहशतवाद्यांचे हस्तक सीरिया, इराक आणि अफगाणिस्तानच्या काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहेत.”  (ISIS Terrorists)

या दहशतवाद्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. चौकशीत देशातील प्रसिद्ध ठिकाणे टारगेट असल्याचे दहशतवाद्यांनी सांगितले. अयोध्येचे राममंदिर, मुंबईचे छाबरा हाऊस आणि देशातील मोठे नेते लक्ष्य असल्याचे दिल्ली पोलिसांच्या चौकशीत उघड झाले. हे तिघे २६/११ पेक्षा मोठा हल्ला करण्याच्या तयारीत होते. या तिघांव्यतिरिक्त दोन ते तीन वेगवेगळ्या लोकांची सध्या चौकशी सुरू आहे. एनआयए वॉन्टेड इसिसचे दहशतवादी शाहनवाज आणि रिझवान यांच्या पत्नीही फरार आहेत. अटक करण्यात आलेल्या मोहम्मद शाहनवाजची पत्नी हिंदू होती, ती धर्मांतरित होऊन ISIS मॉड्यूलशी जोडली गेली होती.

(हेही वाचा – Health Tips : डोळ्यांना निरोगी ठेवण्यासाठी ‘हे’ पदार्थ रोज खा)

पश्चिम घाटात आतंकवादाचा तळ

प्राथमिक चौकशीचा हवाला देत पोलिसांनी सांगितले की, आरोपींनी पश्चिम आणि दक्षिण भारतातील विविध भागात फिरून रेकी केली आहे. त्यांना पश्चिम घाटात आतंकवादाचा तळ बनवायचा होता. शाहनवाजला जयपूरमध्ये पकडण्यात आले होते, तर अशरफ आणि वारसी यांना उत्तर प्रदेशातील अनुक्रमे लखनौ आणि मुरादाबाद येथे अटक करण्यात आली होती. तिघांना एका आठवड्यासाठी पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे. अटकेदरम्यान आरोपींकडून IED फॅब्रिकेशनमध्ये वापरले जाणारे गुन्हेगारी साहित्य जप्त करण्यात आले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.