Asian Games 2023 : भारताने टॉस जिंकत फलंदाजी निवडली; ऋतुराज गायकवाडच्या खांद्यावर मोठी जबाबदारी

184
Asian Games 2023 : भारताने टॉस जिंकत फलंदाजी निवडली; ऋतुराज गायकवाडच्या खांद्यावर मोठी जबाबदारी

होआंगझाओ इथं सुरू असलेल्या आशियाई खेळांचा (Asian Games 2023) आज म्हणजेच मंगळवार ३ क्टोबर हा दहावा दिवस आहे. अशातच आजपासून या स्पर्धेत क्रिकेट या खेळाचे सामने सुरु झाले आहेत. आज भारत आणि नेपाळ यांच्यात क्रिकेट सामना रंगणार आहे. अशातच मिळालेल्या माहितीनुसार, या सामन्यासाठी टीम इंडियाने टॉस जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

भारतीय महिला क्रिकेट संघाने आशियाई स्पर्धेत (Asian Games 2023) सुवर्ण पदक जिकल्यानंतर आता पुरुष संघानेही सुवर्ण पदकावर आपलं नाव करावं अशीच सर्व क्रिक्रेट चाहत्यांची इच्छा आहे. या एशियन गेममध्ये पुरुष क्रिकेट संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी ही ऋतुराज गायकवाड याच्याकडे देण्यात आली आहे. ऋतुराज प्रथमच संघाच्या कर्णधारपदी विराजमान झाला आहे. त्यामुळे त्याच्यासाठी देखील ही स्पर्धा अतिशय महत्वाची आहे.

(हेही वाचा – Asian Games 2023 : भारताची यशस्वी घोडदौड; रोलर स्केटिंगमध्ये दोन कांस्य पदकांची कमाई)

भारत विरुद्ध नेपाळ सामन्यासाठी असा आहे भारतीय संघ

ऋतुराज गायकवाड़ (कर्णधार), यशस्वी जायसवाल, (Asian Games 2023) तिलक वर्मा, शिवम दुबे, रिंकू सिंह, जितेश शर्मा (विकेटकीपर), वॉशिंगटन सुंदर, आर साई किशोर, रवि बिश्नोई, आवेश खान, अर्शदीप सिंह.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.