Bihar Caste Census Survey : चिंताजनक! बिहारमध्ये वाढली मुस्लिमांची संख्या

जातनिहाय जनगणना करणारे पहिले राज्य

188
Bihar Caste Census Survey : चिंताजनक! बिहारमध्ये वाढली मुस्लिमांची संख्या

बिहारमधील (Bihar Caste Census Survey) काँग्रेस आघाडी सरकारने काल म्हणजेच सोमवार २ ऑक्टोबर रोजी राज्यातील जातीनिहाय सर्वेक्षण जनतेसमोर मांडले आहे. या सर्वेक्षणानुसार बिहारमध्ये हिंदूंची संख्या कमी झाली असून मुस्लिमांच्या संख्येत भर पडली आहे. यावर्षीच्या सर्वेक्षणानुसार एकूण ८२ टक्के हिंदू तर १७.७ टक्के मुस्लिमांची नोंद झाली आहे. २०११ – २०२२ च्या तुलनेत हिंदूंची संख्या ८२.७ टक्क्यांवरून ८२ टक्के झाली आहे. तर मुस्लिमांची संख्या १६.९ टक्क्यांवरून १७.७ टक्के झाली आहे.

अशातच, अनुसूचित जाती (एससी) वरण सहा नहा हे. १९.६५ टक्के, अनुसूचित (Bihar Caste Census Survey) जमाती (एसटी) १.६८ टक्के, अतिमागास वर्ग (ईबीसी) ३६ टक्के, इतर मागास वर्ग (ओबीसी) २७ टक्के आणि खुल्या वर्गाची लोकसंख्या ५७, १५.५२ टक्के असल्याचे समोर आले आहे. राज्याच्या एकूण लोकसंख्येपैकी ईबीसी व ओबीसी समुदाय सुमारे ६३ टक्के आहे. तर विविध जातींमध्ये यादव समुदाय सर्वाधिक १४.२६ टक्के, ब्राह्मण ३.६५ टक्के आहेत.

(हेही वाचा – ISIS Terrorists : दिल्लीत अटक करण्यात आलेले दहशतवादी बीटेक, इंजिनीअर; अनेक बॉम्बस्फोटांत सहभाग)

बिहारमधील ही जनगणना (Bihar Caste Census Survey) दोन टप्प्यांमध्ये पूर्ण करण्यात आली. पहिल्या टप्प्यात घरांची यादी आणि घरांची मोजणी करण्यात आली. तर, दुसऱ्या टप्प्यात कुटुंबांची संख्या, त्यांचे राहणीमान, उत्पन्न इत्यादी माहिती गोळा करण्यात आली. पहिला टप्पा २१ जानेवारी २०२३ मध्ये पूर्ण झाला तर दुसरा टप्पा हा १५ एप्रिलपासून सुरु करण्यात आला.

बिहार राज्याचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव (Bihar Caste Census Survey) यांनी ट्विट करत ‘हा बिहारसाठी ऐतिहासिक क्षण असल्याचं म्हंटल आहे. अनेक दशकांच्या संघर्षाचे हे फळ आहे.असेही त्यांनी म्हंटले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.