उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री आणि गोरक्ष पीठाधिश्वर योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी गोरखपूरमध्ये सांगितले की, एकच धर्म आहे आणि तो म्हणजे ‘सनातन धर्म’ ! (CM Yogi statement on Sanatan) बाकीचे सर्व संप्रदाय आणि उपासनेच्या पद्धती आहेत. योगी आदित्यनाथ यांचे आजोबा गुरु ब्रह्मलिन महंत दिग्विजयनाथ यांची ५४ वी पुण्यतिथी आणि योगी आदित्यनाथ यांचे गुरु ब्रह्मलिन महंत अवेद्यनाथ यांच्या नवव्या पुण्यतिथीनिमित्त गोरखनाथ मंदिरात आयोजित सात दिवसीय श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञाच्या शेवटच्या सत्राला संबोधित करताना मुख्यमंत्री योगी यांनी हे प्रतिपादन केले. (CM Yogi statement on Sanatan)
(हेही वाचा – Gadchiroli : गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने दुर्गम भागातील गरजूंना साहित्याचे वाटप)
सनातन धर्मावरील हल्ल्याने मानवतेवर संकट ओढवेल
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री आणि गोरक्षपीठाधीश्वर योगी आदित्यनाथ यांनी २ ऑक्टोबर रोजी सांगितले की, ‘सनातन धर्म हा मानवतेचा धर्म आहे. सनातन धर्मावर आघात झाल्यास जगातील मानवता धोक्यात येईल. गोरखनाथ मंदिराच्या दिग्विजयनाथ स्मारक सभागृहात उपस्थित भाविकांना संबोधित करताना मुख्यमंत्री योगी म्हणाले, ‘श्रीमद भागवताचे सार समजून घेण्यासाठी विचारांचा संकुचितपणा नसावा. संकुचित मनाचे लोक विशालता पाहू शकत नाहीत. या कथा ज्ञानयज्ञात तुम्ही सर्वांनी सात दिवस पूर्ण एकाग्रतेने कथा ऐकली. यामुळे आयुष्यात नक्कीच काही चांगले बदल होतील. (CM Yogi statement on Sanatan)
जे इथे नाही ते जगात कुठेही मिळणार नाही
श्रीमद भागवत महापुराणात मुक्तीबद्दल जे काही सांगितले आहे, ते फक्त सनातन धर्मातच सापडेल आणि इतर कोठेही दिसणार नाही. ही हमी फक्त भगवान वेद व्यास देऊ शकतात, जे इथे आहे ते सर्वत्र आहे आणि जे इथे नाही, ते जगात कुठेही सापडणार नाही. याचा सर्व भारतीय नागरिकांना अभिमान वाटला पाहिजे, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ श्रीमद भागवत महापुराण कथा ज्ञान यज्ञ कार्यक्रमात बोलतांना म्हणाले. (CM Yogi statement on Sanatan)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community