Google Chromebook : गूगल भारतात क्रोमबुक बनवणार, आयटी राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांच्याकडून कौतुक 

125
Google Chromebook : गूगल भारतात क्रोमबुक बनवणार, आयटी राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांच्याकडून कौतुक 
Google Chromebook : गूगल भारतात क्रोमबुक बनवणार, आयटी राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांच्याकडून कौतुक 

गूगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी ट्वीटरवर शेअर केलेल्या माहितीवर इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी प्रतिक्रिया दिली. (Google Chromebook) भारतात क्रोमबुक तयार करण्याच्या गुगलच्या निर्णयाचे इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी कौतुक केले आहे. त्यांनी सोमवारी सांगितले की, गुगलच्या क्रोमबुक उपकरणांची निर्मिती भारतात करण्याच्या योजनेबद्दल जाणून घेतल्याने मला आनंद झाला. आयटी राज्यमंत्र्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली. सरकारच्या मेक इन इंडिया कार्यक्रमाला चालना देण्यासाठी, अल्फाबेट इंकचे Google 2 ऑक्टोबरपासून भारतात टेक जायंटच्या क्रोमबुक लॅपटॉपचे उत्पादन करण्यासाठी PC निर्माता HP सोबत भागीदारीची घोषणा केली. (Google Chromebook)

(हेही वाचा – India Vs Canada : भारत सरकारची कॅनडाला चेतावणी; राजनैतिक अधिकाऱ्यांना परत बोलवा)

“आम्ही भारतात Chromebooks तयार करण्यासाठी HP सोबत भागीदारी करत आहोत. भारतात बनवलेली ही पहिली Chromebooks आहेत आणि भारतीय विद्यार्थ्यांना परवडणाऱ्या आणि सुरक्षित संगणकीय क्षेत्रात प्रवेश करणे सोपे होईल”, असे सुंदर पिचाई यांनी ट्विटरवर लिहिले आहे. (Google Chromebook)

इलेक्‍ट्रॉनिक्‍स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनीही पिचाई यांच्या ट्विटला प्रतिसाद देत Google च्या HP सोबतच्या सहकार्याची प्रशंसा केली. “Google भारतात त्यांच्या क्रोमबुक उपकरणांची निर्मिती करत आहे हे पाहून आनंद झाला. सरकारची दूरदृष्टी आणि PLI धोरणे भारताला इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात झपाट्याने पसंतीचे भागीदार बनवत आहेत आणि सर्वात अलीकडील IT हार्डवेअर PLI2.0 भारतातील लॅपटॉप आणि सर्व्हर निर्मितीला उत्प्रेरित करेल.” (Google Chromebook)

अधिकारी मेक इन इंडियाला पूरक
  • भारतात क्रोमबुक लॅपटॉपचे उत्पादन केल्याने भारतीय विद्यार्थ्यांना परवडणारा पीसी सहज मिळू शकेल. आमच्या उत्पादन कार्याचा आणखी विस्तार करून, आम्ही सरकारच्या मेक इन इंडिया उपक्रमाला पाठिंबा देत आहोत. – विक्रम बेदी, वरिष्ठ संचालक, एचपी, इंडिया
  • आम्हाला आशा आहे की, हे सहकार्य अधिक शाळांमध्ये तंत्रज्ञानाच्या अवलंबनाला गती देण्यास मदत करेल. प्रत्येक विद्यार्थ्याला आणि शिक्षकांना त्यांच्या वैयक्तिक क्षमतांचा साध्य करता येतील. त्यासाठी साधने आणि कौशल्ये उपलब्ध होतील. – बानी धवन, शिक्षण प्रमुख, दक्षिण आशिया, Google

HP 2020 पासून भारतात आपल्या उत्पादन कार्याचा विस्तार करत आहे. कंपनी सध्या HP EliteBooks, HP ProBooks आणि HP G8 मालिकेच्या नोटबुक्ससह भारतात लॅपटॉपच्या विस्तृत श्रेणीचे उत्पादन करते. कंपनीने डेस्कटॉप मिनी टॉवर्स (MT), मिनी डेस्कटॉप (DM), स्मॉल फॉर्म फॅक्टर (SFF) डेस्कटॉप आणि ऑल-इन-वन पीसीची विविध मॉडेल्स जोडून स्थानिक पातळीवर उत्पादित व्यावसायिक डेस्कटॉपचा वापर वाढवला आहे. (Google Chromebook)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.