Hafkin : शासकीय रुग्णालयांत औषधांचा तुटवडा; काय आहे हाफकिनचे काम?

हाफकीन संस्थेनं औषध खरेदी बंद केल्यामुळे राज्यभरातील शासकीय रुग्णालयात औषधांचा तुटवडा जाणवत असल्याचं सांगितलं जातंय

180
Hafkin : शासकीय रुग्णालयांत औषधांचा तुटवडा; काय आहे हाफकिनचे काम?
Hafkin : शासकीय रुग्णालयांत औषधांचा तुटवडा; काय आहे हाफकिनचे काम?
हाफकिन (Hafkin) इन्स्टिट्यूट अथवा हाफकिन प्रशिक्षण, संशोधन व चाचणी संस्था ही भारतातील जीवाणू विज्ञानात संशोधन करणारी एक प्रमुख संस्था आहे. प्लेग रिसर्च लॅबोरेटरी या नावाने डॉ. वाल्देमार हाफकिन यांनी १० ऑगस्ट १८९९ रोजी जीवाणूविज्ञानविषयक संशोधन केंद्राच्या रूपात या संस्थेची स्थापना केली. नंतरच्या काळात पुढे याच हाफकिनच्या माध्यमातून औषधे खरेदीपासून ते वैद्यकीय साधन सामुग्री चे काम देण्यात आले.

मागील काही वर्षांपूर्वी वैद्यकीय शिक्षण विभागात त्यांच्या आखतारित येणाऱ्या इस्पितळांमध्ये लागणारी औषधे तसेच वैद्यकीय साहित्य हे संचालक आणि इस्पितळाच्या डिन पातळीवर खरेदी केली जात होती. परंतु नंतरच्या काळात खरेदी विक्रीचे मध्यवर्तीय ठिकाण म्हणून हाफकिन (Hafkin) इन्स्टिट्यूट ला निवडण्यात आले. हाफकिनच्या माध्यमातूनच खरेदीचे प्रस्ताव पुढे मार्गी लागू लागले. राज्यभरातल्या सर्व वैद्यकीय शिक्षण विभागाचा अखतारित असणाऱ्या इस्पितळांमध्ये औषधांचा पुरवठा करण्याची जबाबदारी हाफकिन इन्स्टिट्यूट कडे देण्यात आली होती. त्यामुळे खरेदीत मोठ्या प्रमाणात विलंब होऊ लागला. असे इस्पितळातील काम करणाऱ्या डॉक्टरांचे म्हणणे आहे. औषधे खरेदीचा व्यवहार हा पुन्हा एकदा संचालक आणि अधिष्ठाता स्तरावर केल्यास अशा अडचणी येणार नाही असे देखील नाव न छापण्याच्या अटीवरती वैद्यकीय क्षेत्रातील काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

नांदेडच्या शासकीय रुग्णालयात गेल्या २४ तासांत म्हणजे १ ऑक्टोबरपासून २४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या मृत्यूंमध्ये १२ नवजात बालकांचा यात समावेश आहे. वेळेवर औषधे पुरवठा झाला नसल्याने रुग्णांना आपला जीव गमवावा लागला असल्याचा आरोप विरोधकांकडनं केला जात आहे. औषधांचा तुटवडा आहे, पण जे रुग्ण अत्यावस्थेत आहेत त्यांच्यासाठी औषधे बऱ्यापैकी उपलब्ध असल्याचं डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयचे अधिष्ठाता वाकोडेंनी सांगितलं.
हाफकीन संस्थेनं औषध खरेदी बंद केल्यामुळे राज्यभरातील शासकीय रुग्णालयात औषधांचा तुटवडा जाणवत असल्याचं सांगितलं जातंय. मधल्या काळात हाफकिन संस्थेकडून औषध खरेदी झाली नाही. त्यामुळे काही प्रमाणात औषधांचा तुटवडा आहे. त्यासोबत रुग्णसंख्या जास्त प्रमाणात वाढल्याने बजेट कमी पडत आहे, हे देखील तितकंच सत्य आहे.

हेही पहा-https://www.youtube.com/watch?v=-81UfMxK-WM

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.