गणेशोत्सवानंतर पितृपक्षाला सुरुवात झाली आहे. त्यानंतर नवरात्रोत्सव येत असल्याने बरेच जण शाकाहाराला प्राधान्य देतात तसेच अनियमित आणि असमाधानकारक पडणारा पाऊस याचा परिणाम दैनंदिन स्वयंपाकात वापरल्या जाणाऱ्या डाळींवर झाला आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये डाळींच्या किमतीत भरमसाठ (Pulses Rate Hike) वाढल्या असून ही वाढ २० टक्क्यांपर्यंत झाली असल्याचे समजते.
पितृपंधरवडा आणि नवरात्रोत्सवाच्या काळात शाकाहारी अन्नपदार्थ आवर्जून प्राधान्याने खाल्ले जातात. त्यामुळे किराणा मालाची मागणी वाढते. या दरवाढीचा सामाना नागरिकांना करावा लागतो. यावर्षी पाऊस अनियमित पडल्यामुळे विविध मालाची आवक घटली. या घटलेल्या आवकेचा परिणाम डाळींवर झाल्याने डाळींच्या दरात वाढ झाली. रवा आणि मैद्याच्या दरातही वाढ झाली असून बाजारात आवक सुरळीत होईपर्यंत पुढील काही महिने दरांमध्ये वाढ कायम राहिल, असा अंदाज व्यावसायिकांनी (Professionals) व्यक्त केला आहे.
वाढलेल्या डाळींच्या दरामुळे गृहिणींचेही आर्थिक गणित बिघडले आहे. डाळींच्या किमती वाढल्यामुळे ग्राहकांकडून काही प्रमाणात मागणीत घटही झाली आहे. आवक सुरळीत होईपर्यंत दरांमध्ये वाढ कायम राहणार असल्याची शक्यता नाशिक धान्य किराणा किरकोळ व्यापारी संघटनेचे अध्यक्ष शेखर दशपुते यांनी व्यक्त केली आहे.
वाढलेले डाळींचे दर (प्रतिकिलो रुपये)
वस्तू दोन महिन्यांपूर्वीचे दर सध्याचे दर
शेंगदाणा १३० १५० ते १६०
तूर डाळ १२० ते १३० १५० ते १६०
मूग डाळ १३० १८०
मसूर डाळ ७० ९० ते १००
भगर (वरी) १२० १३०
साबुदाणा ७० ८० ते ९०