Forest Team Raid : कराड येथे वनविभागाची छापेमारी; वन्य प्राण्यांची नखे, शिंगे, पंजे हस्तगत

92
Forest Team Raid : कराड येथे वनविभागाची छापेमारी, वन्य प्राण्यांची नखे, शिंगे, पंजे हस्तगत
Forest Team Raid : कराड येथे वनविभागाची छापेमारी, वन्य प्राण्यांची नखे, शिंगे, पंजे हस्तगत

बिबट्याच्या शिकारप्रकरणी (Forest Team Raid) वन विभागाने कराड (Karad by Forest Department) शेजारील ओगलेवाडी-हजारमाची (Oglewadi-Hazarmachi ) येथे संशयिताच्या टाकलेल्या छाप्यात बिबट्याचे कातडे, गवा, भेकर, हरिण यांची शिंगे यासह अन्य साहित्य आढळले. पुण्याच्या खडकवासला (Khadakwasla) परिसरात बिबट्याची शिकार करण्यात आली होती.

पुण्याच्या खडकवासला धरणालगतच्या मांडवी बुद्रुक (Mandvi Budruk) येथील फार्म हाऊसमध्ये बिबट्याचे कातडे आणि अवयव लपवून ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला होता. पोलिसांना वन विभाग अधिकाऱ्यांनी या घटनेबाबत माहिती दिली. या गुन्ह्याप्रकरणी पोलिसांनी विश्वजीत जाधव आणि अभिजीत जाधव (रा. डेक्कन जिमखाना, पुणे) यांच्याविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. या दोघांचे मूळ गाव ओगलेवाडी-हजारमाची, ता. कराड हे असल्याने वनक्षेत्रपाल प्रदीप संकपाळ (Forester Pradeep Sankpal) यांच्या पथकाने जाधव यांच्या घरावर छापा मारला.

(हेही वाचा – Pulses Rate Hike : डाळींच्या दरांमध्ये भरमसाठ वाढ, सणावाराच्या दिवसांत महिलांचे आर्थिक गणित बिघडले )

त्यावेळी पोलिसांनी अभिजित जाधव आणि विश्वजीत जाधव यांच्या घरावर छापा टाकला. यावेळी बिबट्याचे कातडे, गवा, भेकर हरिण यांची शिंगे, पंजे, नखे असे अवयव जप्त केले. हे वन्यजीव अवयव तपासण्यासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहेत. अशी माहिती या गुन्ह्याप्रकरणी कारवाई करणारे पुण्याच्या भांबुर्डीचे वनक्षेत्रपाल प्रदीप संपकाळ यांच्या पथकाने केली. या कारवाईमुळे वन्यप्राण्यांच्या शिकारीचे इतरही गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.

हेही पहा – 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.