कर्नाटक सरकार म्हणते, आम्ही अल्पसंख्यांकांच्या पाठिशी; BJP चा काँग्रेसवर हल्लाबोल

191

रविवारी, १ ऑक्टोबर रोजी रात्री शिवमोग्गा येथे ईद मिलाद मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली, त्यानंतर हिंदूंच्या घरांवर तसेच पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. कर्नाटकात जातीय दंगली उद्भवल्या आहे. यावर भाजप नेत्यांनी राज्य सरकारवर टीका केली. काँग्रेस सरकार कायदा व सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरली आहे. शिवमोग्गा हे सांप्रदायिकदृष्ट्या संवेदनशील शहर आहे, परंतु पोलिस मिरवणुकीदरम्यान खबरदारी घेण्यात अपयशी ठरले. दगडफेक करणार्‍यांना आणि उपद्रव करणाऱ्यांना सध्याच्या सरकारच्या काळात कायद्याची भीती नाही, असे  BJP चे नेते, माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले.

शिवमोग्गा येथे दगडफेक पूर्वनियोजित

गृहमंत्री डॉ. जी परमेश्वर यांनी ही घटना छोटी असल्याचे वर्णन केले, परंतु घरांवर दगडफेक करण्यात आली. डॉ. जी परमेश्वर यांचे हे विधान कुरघोडी करणारे आहे. कोलारमध्येही अशीच घटना घडली आहे. सरकार अशा घटकांना अप्रत्यक्षपणे पाठबळ देत आहे. या वृत्तीमुळे राज्यात जुगारी, समाजकंटक आणि दंगलखोर मोकाट फिरत आहेत, असे BJP चे नेते बसवराज बोम्मई म्हणाले. मिरवणुकीत हिंदू आणि पोलिसांवर दगडफेक झाल्याचा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते बसनगौडा पाटील यांनी केला. काँग्रेस उघडपणे सांगते की, ते अल्पसंख्याकांच्या पाठीशी उभे आहेत, आम्ही फक्त हिंदूंसाठी आहोत. शिवमोग्गा येथे दगडफेक पूर्वनियोजित असल्याचा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते सीटी रवी यांनी केला.

(हेही वाचा जातीनिहाय जगणनेच्या मुद्द्यावर PM Narendra Modi यांचा काँग्रेसवर जोरदार प्रहार; म्हणाले…)

शिवमोग्गाच्या रस्त्यावर जिहादी तलवारी आणि शस्त्रे घेऊन धावतात 

शिवमोग्गा येथील रागीगुड्डा परिसर हा जातीयदृष्ट्या संवेदनशील आहे. पोलिसांना हे माहीत असताना त्यांनी टिपू सुलतानचे कटआउट परिसरात का लावले? ते आपल्या राजकीय हेतूंसाठी जातीयवादी शक्तींचा वापर करत आहेत हे दुर्दैवी आहे. BJP चे नेते, माजी उपमुख्यमंत्री डॉ. सीएन अश्वथ नारायण म्हणाले की, काँग्रेस संस्कृती आणि धर्म नष्ट करणाऱ्या लोकांना प्रोत्साहन देत आहे. BJP भाजप कर्नाटकने म्हटले की, शिवमोग्गाच्या रस्त्यावर जिहादी तलवारी आणि शस्त्रे घेऊन धावत आहेत, तर ‘धर्मनिरपेक्ष’ सिद्धरामय्या लपून बसले आहेत. काँग्रेस सरकार पुन्हा सत्तेत आल्याने, कारवाईची भीती न बाळगता हिंदूंना दहशत माजवण्यासाठी जिहादी संघटना लपून बसल्या आहेत. काँग्रेसने जिहादींना शरणागती पत्करली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.