विशेष प्रतिनिधी
उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांना महापालिका मुख्यालयात कार्यालय दिल्यानंतर शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनाही महापालिका मुख्यालयात कार्यालय उपलब्ध करून देण्यात आले असून बुधवारी ते या कार्यालयाचा ताबा घेणार आहेत. महापालिका प्रशासनाने शिक्षण समिती अध्यक्षांचे दालन हे केसरकर यांच्यासाठी तक्रार निवारण कक्ष कार्यालयासाठी उपलब्ध करून दिले असून दर बुधवारी दुपारी १ ते ४ या वेळेत सर्व सामान्य जनेतला भेटणार आहेत. (Deepak Kesarkar)
मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात यांना महापालिका मुख्यालय इमारतीत नागरिक तक्रार निवारण कार्यालयासाठी दालन उपलब्ध करून दिले आहे. उद्यान समिती अध्यक्षांचे कार्यालय आणि त्याला जोडून असलेली अँटी चेंबर ही मंत्र्यांना देण्यात आली असून त्यांच्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांसाठी बाजुच्या कार्यालयाची जागा देण्यात आली आहे. या कार्यालयीन कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या कार्यालयाला जोडून शिक्षण समिती अध्यक्षांच्या दालनाची संलग्न अँटी चेंबर आहे. ही अँटी चेंबर सुरुवातीपासून बंद होती. परंतु प्रशासनाने या अँटी चेंबरची अतिरिक्त जागा लोढा यांच्या कार्यालयासाठी खुली करून दिली आहे. (Deepak Kesarkar)
(हेही वाचा – Caste-Wise Report : काँग्रेस सरकाने जातीनिहाय अहवाल दाबून का ठेवला? राहुल गांधी यांचे पितळ उघडे पडले)
परंतु आता याच शिक्षण समिती अध्यक्षाच्या दालनाची जागा शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यासाठी आता उपलब्ध करून दिली आहे. केसरकर यांनी आपल्याला दालन उपलब्ध व्हावे अशी मागणी आयुक्तांकडे केल्यानंतर हे दालन उपलब्ध करून देण्यात येत आहे. या दालनाची साफसफाई करून आणि पडदे तसेच दूरध्वनी जोडणी करण्यात आली आहे. त्यामुळे या दालनाचे उद्घाटन करून हे कार्यालय जनतेसाठी खुले केले जाणार आहे. (Deepak Kesarkar)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community