इस्त्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने पुन्हा एकदा मंगळावर जाण्याची तयारी केली आहे. याकरिता भारत आणखी एक यान ग्रहावर पाठवण्यास तयार आहे, अशी माहिती इस्त्रोच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
या मोहिमेला मार्स ऑर्बिटर मिशन-२ला ‘मंगळयान -२’ (Mangalyaan-2 Mission) असे नाव देण्यात आले आहे. या मोहिमेशी संबंधित मिळालेली माहिती अशी की, मंगळावर पाठवल्या जाणाऱ्या यानावर बसवण्यात येणारी विविध वैज्ञानिक उपकरणे विकासाच्या विविध टप्प्यांवर आहेत, असे इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी सांगितले.
(हेही वाचा – कर्नाटक सरकार म्हणते, आम्ही अल्पसंख्यांकांच्या पाठिशी; BJP चा काँग्रेसवर हल्लाबोल )
अत्याधुनिक रोव्हरसह मंगळावर उतरणार
हे यान अत्याधुनिक रोव्हरसह मंगळावर उतरेल आणि मंगळाचा अभ्यास करेल. हे यान विविध वैज्ञानिक उपकरणे स्वत:सोबत घेऊन जाणार असून त्याद्वारे ते मंगळावरील वातावरण, पर्यावरण, आंतरग्रहीय धूळ आणि मंगळाच्या विविध पैलूंचा अभ्यास करणार आहे.