केंद्रामुळे लसीकरण मोहिमेचा बट्ट्याबोळ! अनंत गाडगीळांचा आरोप

सकाळी  टीव्हीवर  राज्य  सरकारला  सहकार्य करायची विधाने  करायची  आणि  संध्याकाळी  राज्य  सरकारवर  सडकून  टीका  करणाऱ्या  प्रतिक्रिया द्यायच्या.  यातून  भाजपच्या  नेत्यांचा दुतोंडीपणा  स्पष्ट  दिसून  येतो, असे अनंत गाडगीळ म्हणाले.

133

महाराष्ट्रामध्ये  कोरोनाच्या  दुसऱ्या  लाटेने  थैमान  घातले  असताना  केवळ  ३  दिवस  पुरेल  एवढाच  लसीचा  साठा  असल्याचे  आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आजच्या  विधानावरून केंद्र सरकार महाराष्ट्राला जाणूनबुजून  सावत्र  वागणूक  देत  असल्याचे  सिद्ध  होत  आहे. वास्तविक  महाराष्ट्राला  अधिक  लस  पुरवून  सर्वात  बाधीत  जिल्ह्यामध्ये  सर्वाना  लसीकरण  करण्याची  केंद्राने  परवानगी  देणे  समयोचित  ठरले  असते.  पण  सम्पूर्ण  लसीकरण  हा  विषय,  त्याबाबतचे  धोरण, इ स्वतःच्या  ताब्यात  ठेवत  केंद्राने  लसीकरण  मोहिमेचा  जणू  बट्याबोळ  केला  आहे,  अशी  खरमरीत  टीका  काँग्रेसचे  राष्ट्रीय  पॅनल  प्रवक्ते  आमदार  अनंत  गाडगीळ  यांनी  केली.

भाजपच्या  नेत्यांचा  दुतोंडीपणा!

भारत बायो  व  सिरम  यांची  दोन्ही  मिळून  वर्षाला  केवळ  २.५  कोटी  लस निर्माण  करण्याची  क्षमता  असल्यामुळे,  या  गतीने  १२५  कोटी  भारतीयांना  लस  मिळण्यास  कित्येक  वर्षे  थांबावे  लागेल.  त्याउलट,  परदेशात  प्रभावी  ठरलेल्या  लस  कंपन्याना  भारतात  परवानगी  नाकारून  नको  तिथे  आत्मनिर्भयपणा  केंद्र  सरकार  दाखवत  आहे.
महाराष्ट्रात, एकीकडे  सकाळी  टीव्हीवर  राज्य  सरकारला  सहकार्य करायची विधाने  करायची  आणि  संध्याकाळी  राज्य  सरकारवर  सडकून  टीका  करणाऱ्या  प्रतिक्रिया टीव्हीवर  द्यायच्या.  यातून  भाजपच्या  नेत्यांचा  दुतोंडीपणा  स्पष्ट  दिसून  येतो, असेही गाडगीळ म्हणाले.

(हेही वाचा : ब्रेक दि चेन संदर्भात राज्य शासनाच्या नव्या स्पष्ट सूचना! कसे आहेत नियम?)

जाहीर  सभा ऐवजी ‘ऑनलाईन’ प्रचार  का  केला  नाही?

आश्चर्याची  बाब  म्हणजे,  महाराष्ट्रात  कोरोनाच्या  हाहाकाराच्या  देशभर  सर्वत्र  बातम्या  आणि  निवडणूक  होत असलेल्या  राज्यातून  कोरोनाचा  नाव निशाणा  नाही  हे  न  पटणारे  आहे.  ‘ऑनलाईन’चा  आग्रह  धरणाऱ्या  मोदींनी  मग  जाहीर  सभा ऐवजी ‘ऑनलाईन’ प्रचार  का  केला  नाही? मोदींनी  व  अमित  शाह  यांनी  सभांतून ‘सोशल  डिस्टनसिंग’ चे आवाहन  का  केले  नाही,  असाही  सवाल गाडगीळ  यांनी  केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.