Crime : पिंपरी-चिंचवडमध्ये चार सराईत गुन्हेगारांकडून 5 पिस्तुल, 10 काडतूसे जप्त

145

पिंपरी-चिंचवड शहर पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली आयुक्तालयाचे हद्दीमध्ये व्हीव्हीआयपी दौऱ्याच्या अनुषंगाने व गणेशोत्सवाचे काळात कार्यक्षेत्रामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरीता संशयीतांची तपासणी मोहिम राबविण्यात आली होती. या अंतर्गत गुन्हे Crime शाखांच्या सर्व अधिकारी यांना सराईत गुन्हेगारांचे हालचालीवर लक्ष ठेवणेबाबत सुचना दिलेल्या होत्या.

गुन्हे Crime शाखेकडील खंडणी विरोधी पथकाने चार सराईत गुन्हेगारांना अटक केली. त्यांच्याकडून पाच पिस्तुल आणि दहा काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. अस्लम अहमद शेख (रा. थेरगाव), सचिन उत्तम महाजन (रा. सुरवड, ता. इंदापूर), संतोष विनायक नातू (रा. स्वारगेट, पुणे), राहुल उर्फ खंडू गणपत ढवळे (रा. पिंपळगाव, ता. दौंड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे Crime शाखेकडील खंडणी विरोधी पथकाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, सहा. पोलीस निरीक्षक उध्दव खाडे व अंमलदार हे संशयीतांची माहिती काढत असतांना खंडणी विरोधी पथकातील पोलीस रमेश गायकवाड, गणेश गिरीगोसावी, विजय नलगे रहाटणी येथे गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना जगताप डेअरी चौकात एकजण थांबला असून त्याच्याकडे शस्त्र असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून अस्लम शेख याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून झडती घेतली असता त्याच्याकडून एक पिस्तुल जप्त केले आहे.

(हेही वाचा Bihar Caste Census Survey : बिहारच्या जातनिहाय जनगणनेवर भाष्य करणार नाही – सर्वोच्च न्यायालय)

पोलिसांनी अस्लम शेख त्याच्याकडे कसून चौकशी करून त्याच्या अन्य तीन साथीदारांना अटक करण्यात आले. संबंधित आरोपींकडून चार पिस्तुल आणि दहा काडतुसे असा एकूण दोन लाख 55 हजारांचा ऐवज जप्त केला. सचिन, संतोष, राहुल हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर पुणे, पुणे ग्रामीण आणि सोलापूर येथे दरोडा, खून, खुनाचा प्रयत्न, खंडणीसाठी अपहरण, जबरी चोरी, जबर दुखापत करणे, बेकायदेशीरपणे अग्नी शस्त्र बाळगणे असे गुन्हे दाखल आहेत.

आरोपी सचिन महाजन, संतोष नातु व राहुल ढवळे हे पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असुन, त्याचे विरुध्द पुणे शहर, पुणे ग्रामीण व सोलापूर येथे दरोडा, खून, खुनाचा प्रयत्न, खंडणीसाठी अपहरण, जबरी चोरी, जबर दुखापत करणे, बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगणे असे गुन्हे दाखल आहे. आरोपी सचिन महाजन याचेवर मोका अंतर्गत पुणे ग्रामीण येथे कारवाई झालेली आहे. तसेच आरोपी संतोष नातु याचेवर पुणे शहर येथे तडीपार कारवाई करण्यात आली होती. सदरची कारवाई विनय कुमार चौबे, पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, डॉ. संजय शिंदे पोलीस सह आयुक्त, वसंत परदेशी अपर पोलीस आयुक्त, स्वप्ना गोरे, पोलीस उप-आयुक्त. गुन्हे, सतिश माने, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे यांचे मार्गदर्शनाखाली अरविंद पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहा. पोलीस निरीक्षक उध्दव खाडे, सहा. पोलीस उप-निरीक्षक रमेश गायकवाड यांच्या पथकाने केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.