Intercity Express: पुणे-सोलापूर-पुणे इंटरसिटी एक्सप्रेस रद्द, सोलापूरकरांची तारांबळ

विविध तांत्रिक कामांकरिता ब्लॉक घेण्यात आला आहे

125
Intercity Express: पुणे-सोलापूर-पुणे इंटरसिटी एक्सप्रेस रद्द, सोलापूरकरांची तारांबळ
Intercity Express: पुणे-सोलापूर-पुणे इंटरसिटी एक्सप्रेस रद्द, सोलापूरकरांची तारांबळ

मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील पुणे-दौंड रेल्वेमार्गावरील (Pune-Daund Railway) पाटस स्थानक येथे विविध तांत्रिक कामांकरिता ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे सोलापूर-पुणे हुतात्मा एक्सप्रेस आणि पुणे-सोलापूर इंटरसिटी एक्स्प्रेस (pune-solapur-pune-intercity-express) , दौंड-हडपसर, बारामती-दौंड एक्स्प्रेस, पुणे-बारामती पॅसेंजर, पुणे-दौंड-पुणे पॅसेंजर या गाड्या रद्द झाल्या आहेत.

मुंबई-बंगळूर उद्यान एक्सप्रेसला (पाटस), हैदराबाद-मुंबई एक्स्प्रेस (पाटस), चेन्नई-लोकमान्य टिळक टर्मिनल एक्सप्रेस (पाटस, लोणी), मुंबई-लोकमान्य टिळक टर्मिनल एक्सप्रेस (यवत), कोईम्बतूर-हैदराबाद एक्सप्रेस (पाटस, उरुळी) या गाड्यांना तात्पुरता थांबा देण्यात आला आहे. या गाड्यांना तात्पुरता थांबा देण्यात आल्याची माहिती पुणे विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. या ब्लॉकमुळे सोलापूर-पुणे प्रवास करणाऱ्या सोलापूरकरांची तारांबळ उडाली आहे.

(हेही वाचा – Increase In Epidemics : मलेरिया-डेंग्युची साथ वाढतेय, तापावर स्वत:हून उपचार करू नका, वाचा तज्ज्ञांचा सल्ला)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.